बुधवार, ६ एप्रिल, २०१६

बरे झाले देवा माझा विदर्भ मागासलेला आहे ………

मराठवाडा व इतर काही भागातील दुष्काळ व पाणी टंचाईच्या बातम्या वाचल्या की माझ्या विदर्भाला मागास ठेवणाऱ्या महाराष्ट्र/विदर्भाच्या नेत्यांना मला धन्यवाद द्यावेसे वाटतात. महाराष्ट्रातील बहुसंख्य साखर कारखाने मराठवाड्यातील बीड,परभणी,लातूर, औरंगाबाद, उस्मानाबाद, पुणे,सोलापूर, अहमदनगर या भागात एकवटले आहेत. तेथे भूजलाचा प्रचंड उपसा झाला आहे. (संदर्भ आंदोलन मासिक, एप्रिल १६). माझ्या विदर्भात पाणी परिस्थिती ( काही ठराविक गांवे वगळता) बरी आहे. विकास म्हणजे नैसर्गिक संसाधानांचे अपरिमित दोहन. माझ्या विदर्भात विकास नाही. म्हणून परिस्थिती आटोक्यात आहे. याआधी अमरावती शहरात औद्योगिक वसाहत होतीच. पण पश्चिम विदर्भाचा विकास व्हावा या 'उदात्त' विचाराने सरकारने नवीन पंचतारांकित औद्योगिक वसाहत शेतकऱ्यांची २८०० हेक्टर जमीन ताब्यात घेऊन  उभारली. उद्योग फारसे आले नाहीत. मात्र इंडिया बुल नावाच्या कंपनीने अप्पर वर्धा प्रकल्पाच्या पाण्यावर डल्ला मारायला सुरुवात केली. माझी देवाकडे अशी मागणी आहेकी ही पंचतारांकित औद्योगिक वसाहत भंगारात जाऊ दे. पण आम्हाला विकास नको. देवा माझ्या विदर्भाला मागासच ठेव.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: