बिहारी झटका , गावांत संपूर्ण
दारूबंदी, घरात धुंद होत धिंगाणा घातल्यास १० वर्षे कैद
बिहारमध्ये आता घरात मद्यधुंद होऊन धिंगाणा घालणाऱ्यांची गय केली जाणार
नाही. नवीन कायद्यानुसार तसे आढळून आल्यास १० वर्षांची कैद होऊ शकते. ९२
मिनिटांच्या चर्चेनंतर बिहारमध्ये हा दारूबंदी कायदा लागू करण्यात आला आहे.
एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी होईल. राज्यातील गावांत संपूर्ण
दारूबंदी लागू होणार आहे. शहरातही देशी आणि मसालेदार दारू विकली जाणार
नाही. दुसऱ्या टप्प्यात शहरी भागात परदेशी दारूविक्रीवर बंदी आणली जाईल.
विषारी दारू पिऊन मृत्यू झाल्यास मद्यनिर्मिती आणि त्याची विक्री
करणाऱ्यांच्या विरोधात मृत्युदंडाची तरतूद करण्यात आली आहे. देशी दारूमुळे
एखाद्यास अपंगत्व आल्यास जन्मठेपेची तरतूद आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा