रविवार, १३ सप्टेंबर, २०१५

अजून हे विधान कुणी कसे केले नाही ? (Calculated Risk)
ही विधाने केल्या गेली आहेत. १) मोदींना विरोध करणाऱ्यांनी पाकिस्तानात निघून जावे-गिरिराजसिंग . २) योगाला विरोध करणाऱ्यांनी पाकिस्तानात निघून जावे-कुणी तरी साध्वी .  अशी पाकिस्तानात निघून जाण्याला सबळ कारणे देणारी बरीच विधाने झाली आहेत. पण भूसंपादन विधेयकाला विरोध करणाऱ्यांनी पाकिस्तानात निघून जावे असे विधान मात्र कुण्याही आचराटाने केले नाही. कारण भूसंपादन विधेयकाला मुख्यत: (प्रकट) विरोध होत  आहे तो संसदेतून व संसद सदस्यांना पाकिस्तानात निघून जा म्हणणे म्हणजे संसदेचा अवमान करणे होय व त्याबद्दल असे वक्तव्य करणारयाला संसद  स्वत:च शिक्षा फर्मावू शकते त्यामुळे कुणी आचरटसिंग अथवा आचरटाचार्य या भानगडीत पडले नाही. याला म्हणतात मोजून मापून जोखीम पत्करणे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: