नॅशनलहेरॉल्ड प्रकरण
नॅशनलहेरॉल्ड प्रकरणात वादात अडकलेल्या काँग्रेसने आपल्या नेतृत्वाच्या बचावासाठी कायद्यातील तज्ज्ञांना मैदानात उतरवले आहे. कपिल सिब्बल यांच्यानंतर आता पी. चिदंबरम आणि अश्विनीकुमार यांनीही सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे. गांधींवरील आरोप बिनबुडाचे आहेत, असे चिदंबरम यांनी म्हटले आहे.चिदंबरम रविवारी म्हणाले, या व्यवहारात काहीही गैर नाही. कोणताही लाभ घेता येणार नाही अशी ही कंपनी आहे. त्यामुळे वैयक्तिक स्वरूपात एक रुपयाचाही लाभ कोणाला मिळू शकत नाही. दुसरीकडे अश्विनीकुमार म्हणाले, काँग्रेस नेतृत्वावर बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. सर्व प्रकारचे व्यवहार वैध स्वरूपातील आहेत. पटियाला हाऊस कोर्टाने भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांच्या तक्रारीवर सोनिया, राहुलसह अन्य नेत्यांना समन्स जारी केले होते. वैयक्तिक हजर राहण्यापासून सूट देण्याची विनंती करणारा अर्ज दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावला होता. आता १९ डिसेंबर रोजी त्यांना कोर्टात हजर व्हावे लागेल. या मुद्द्यावर गेल्या आठवड्यापासून संसदेचे कामकाज ठप्प आहे. भाजप आपल्या निधीतून मासिक चालवते. त्यात तोटा दाखवल्यास ते योग्य आणि पुण्यकर्म ठरते. परंतु तेच नॅशनल हेरॉल्डमध्ये घडत असल्यास ते चुकीचे आणि बेकायदा ठरते. हा दुटप्पीपणा आहे, कपिल सीब्बल म्हणाले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा