१७ डिसेंबर, स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एक सोनेरी पान.
१९७१ चा तो महापराक्रम, महाविजय. . ……१९७१ साली तेंव्हाच्या पूर्व पाकिस्तानातून निर्वासितांचे लोंढे भारतात यायला लागले व त्यातही पाकिस्तानने कुरापत काढताच इंदिराजींनी अमेरिकेच्या दबावाला भिक न घालता पाकिस्तानचे दोन तुकडे केले व पूर्व पाकिस्तानचे रुपांतर बांगला देश मध्ये झाले.
या युद्धामुळे जगाचा इतिहासच नव्हे तर भुगोलही बदलला. पाकिस्तानच्या लष्करी कमांडरने लेखी शरणागती (Agreement of Surrender) लिहून दिली. पाकिस्तानचे ९३,००० सैनिक युध्दबंदी बांगला देशामधून ताब्यात घेऊन भारतात आणल्या गेले. तेंव्हाचे विरोधी पक्ष नेते अटल बिहारी वाजपेयी यांनी इंदिराजींचा उल्लेख " वो तो साक्षात दुर्गा हैं " असा केला तर पत्रकारांनी त्यांना 'याह्यासुर मर्दिनी ' असे म्हटले. कारण तेंव्हा पाकिस्तानचे राष्ट्रप्रमुख जनरल याह्याखान हे होते.
या अभूतपूर्व कार्यासाठी इंदिराजींना 'भारत रत्न' पुरस्काराने गौरविले गेले तर लष्करप्रमुख Sam Maanekshaw यांना 'फिल्ड मार्शल' अशी पदोन्नती देण्यात आली. भारतीय लष्करातील ते एकमेव 'फिल्ड मार्शल' आहेत. (फिल्ड मार्शल पदावरील व्यक्ती निवृत्त झाली तरी ती कायम लष्कराशी जुळलेली असते)
मोदी सरकारने नुकताच १९६५ च्या युद्धाला पन्नास वर्षे झाली म्हणून एक आठवड्याचा संस्मरण सोहळा आयोजित केला होता. कारगिल विजय दिन सुद्धा साजरा केला जातो. १९६५ चे युध्द व कारगिल हे दोन्ही "विजय" असतील तर १९७१ हा महामहा विजय होता. परंतु १९६५ व कारगिल युद्धाच्या वेळेस साली गांधी किंवा नेहरू आडनावाचा पंतप्रधान नव्हता ही मोदी सरकारच्या दृष्टीने महत्वाचे ठरते असे दिसते.असो चित्रपटगृहात १७ डिसेम्बरच्या त्या महामहाविजयाची डॉक्युमेंट्री पाहून आम्ही धन्य झालो होतो.
ज्यांना हे भाग्य लाभले नसेल त्यांच्यासाठी युट्युब आहेच.
पहा आणि धन्य व्हा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा