रविवार, १३ डिसेंबर, २०१५

सोयीचे ते लक्षात ठेवा, गैरसोयीचे ते विसरा. ………. 

पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल म्हणतात की ते शीखविरोधी दंगल कधी विसरू शकणार नाही. (वृत्तपत्रांमधूनआज प्रकाशित झालेली बातमी) पण बादल हे त्यांच्याच राज्यात दहा वर्षे खलिस्तानवाद्यांनी जो धुमाकूळ घातला होता व त्यादरम्यान हजारो निरपराध नागरिकांचा बळी गेला त्याबद्दल मात्र ते काहीच बोलत नाहीत. भिद्रांवाले नावाच्या तथाकथित महंताने सुवर्णमंदिरात आपले बस्तान मांडून शिखांच्या पवित्र स्थळाला किल्याचे स्वरूप आणले होते. अखेर पोलादी महिला इंदिरा गांधी पंतप्रधान असतांना 'ऑपरेशन ब्लू स्टार' मोहीम आखून व सुवर्ण मंदिरात लष्कर पाठवून पंजाबला या दहशतवादापासून मुक्ती मिळवून दिली.  त्यासाठी इंदिराजींना आपल्या प्राणाचे बलिदान द्यावे लागले. लष्करी कारवाईचा बदला म्हणून त्यांच्या सोबतच या मोहिमेच्या काळात लष्कर प्रमुख असलेले जनरल वैद्य यांची सुद्धा अतिरेक्यांनी भरदिवसा पुण्यात हत्या केली. विशेष म्हणजे इंदिराजींच्या खुन्यांना हुतात्मा मानणारा एक वर्ग पंजाबमध्ये आहे व खुन्यांच्या नातेवाईकांचा वेळोवेळी सत्कारही केल्या जातो. त्याबद्दल बादल कधी बोलतांना दिसत नाहीत. शीखविरोधी दंगल १९८४ सालची. म्हणजे ३१ वर्षांपूर्वींची. बादल ती विसरू शकत नाहोत. दहा बारा वर्षांपूर्वीची जातीय दंगल मात्र बादल विसरू शकतात. हे बादल पंजाबचे मुख्यमंत्री आहेत तर त्यांचा मुलगा उपमुख्यमंत्री आहे. आणि सुनबाई केंद्रात कॅबिनेट मंत्री आहेत याला घराणे शाही म्हणता येणार नाही कारण त्यांचे आडनाव बादल आहे, गांधी नाही. घराणेशाही फक्त गांधी घराण्यातच असते.
राजेंद्र कडू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: