हिंदू महासभेने घेतली दाऊद इब्राहिमची कार?
|
|
|
अंडरवर्ल् डॉन दाऊद इब्राहिमच्या मालमत्तेचा बुधवारी लिलाव झाला, त्यात
हिंदू महासभाही सहभागी झाली होती. मात्र या संघटनेचा सहभाग खरेदीसाठी होता
की, राजकीय प्रसिद्धी मिळवण्यासाठी होता, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कारण दाऊदच्या हॉटेलसाठी बोली न लावता महासभेच्या प्रतिनिधींनी एका फुटकळ
कारसाठी सर्वाधिक बोली लावून लिलावातून बाहेर जाणे पसंत केले. विशेष म्हणजे
ती कार दाऊदचीच आहे याबद्दल अजून कोणतेही ठोस पुरावे नाहीत. हिंदू
महासभेचे स्वामी चक्रपाणी यांनी मात्र ही कार आपण खरेदी केल्याचा दावा
केला आहे. दाऊदच्या हॉटेलसह आणखी सात मालमत्तांचा लिलाव बुधवारी
झाला. यात गुजरात मधील चार भुखंड, मुंबईतील माटुंगा येथील एक सदनिका, हॉटेल
रोनक अफरोज आणि एका ह्युंदाई अॅसेंट कारचा समावेश होता. यापैकी हॉटेल रौनक
अफरोज (दिल्ली जायका)वगळता इतर सहा मालमत्ता या दाऊदच्या आहेत का याबद्दल
कोणतेही पुरावे नाहीत. त्यामुळे 'आपण खरेदी केलेली कार ही दाऊदचीच आहे
का?' याबद्दल विचारले असता, हिंदू महासभेच्या महासचिव इंदिरा तिवारी
म्हणाल्या की, या सातही मालमत्ता दाऊदच्याच आहेत, असे लिलाव करणाऱ्या
कंपनीने सांगितले होते. मात्र आता ही कार दाऊदची नाही अशी माहिती पुढे येत
असल्याने आपली दिशाभूल केल्याचेही त्या म्हणाल्या. हिंदूमहासभेची
स्टंटबाजी? दाऊदची मालमत्ता खरेदी करण्याचा आपला हेतू होता. तर मग हॉटेल
रौनक अफरोजसाठी बोली लावताच आपण लिलावातून बाहेर का जात आहात?' या
प्रश्नावर समर्पक उत्तर देण्याऐवजी चक्रपाणी यांनी 'दाऊदचे जनमानसातले भय
कमी करण्यासाठी आम्ही या लिलावात सहभागी झालो ,' एवढेच उत्तर दिले.
त्यामुळे खरोखरच हिंदू महासभेला ही मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा होती की,
निव्वळ प्रसिद्धी मिळवण्यासाठीचा हा स्टंट होता, अशी चर्चा रंगली होती.(दिव्यमराठी) |
नरेंद्र
मोदी सरकार २६ मे २०१४ रोजी सत्तारूढ झाले. मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या
शपथविधीसाठी दक्षिण आशिया परिषदेच्या (सार्क) सदस्य देशांच्या नेत्यांना
निमंत्रित करण्यात आले होते. या नेत्यांनी शपथविधी समारंभाला उपस्थित राहून
मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले होते. यापैकी तीन शेजारी देशांचे
भारताबरोबरचे संबंध ताणले गेले आहेत. इतर शेजारी देशांनीही सावधगिरीचा
पवित्रा घेतलेला दिसतो. या दुराव्याचे ठळक उदाहरण म्हणजे भारताचे
नेपाळबरोबरचे संबंध विकोपाला जाण्याइतपत घडलेल्या घडामोडी. - See more at:
http://www.loksatta.com/samorchyabakavrun-news/across-the-aisle-how-to-lose-a-friend-and-alienate-people-1167856/#sthash.kDpEMhgj.dpuf

| . |

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा