गुरुवार, १० डिसेंबर, २०१५

आता समजले हे सरकार सूटबूटवाल्यांची जास्त काळजी का करते ?
पैसा बोलता हैं. ९४ टक्के देणगी उद्योग जगताकडून.
भाजपला एक वर्षात ४३७.३५ कोटी. एडीआरने जारी केली माहिती.

"भाजपच्या निधीत एक वर्षात तब्बल १५६ टक्क्यांनी वाढ
२०१४-१५ मध्ये पक्षाला एकूण ४३७.३५ कोटी रुपयांचा निधी मिळाला. 
काँग्रेस+राष्ट्रवादी काँग्रेस+माकप आणि भाकपला मिळालेल्या एकूण देणगीपेक्षाही दुप्पट आहे.
राष्ट्रीय पक्षांच्या निधीत १५१ टक्क्यांनी वाढ, ९४ टक्के देणगी उद्योग जगताकडून मिळालेली आहे.

भाजपला काँग्रेसपेक्षा अधिक,
राष्ट्रीयपातळीवरील पक्षांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या अहवालानुसार वर्ष २०१४-१५ मध्ये ९२.६१ टक्के निधीची रक्कम उद्योग विश्वातून मिळालेली आहे. केवळ ७.२९ टक्के वैयक्तिक पातळीवरील देणगी आहे.
काँग्रेसला १४१ कोटी
गेल्यावर्षी राष्ट्रीय पक्षांना ६२२.३८ कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे. त्या अगोदरच्या तुलनेत त्याचे प्रमाण १५१ टक्क्यांनी अधिक आहे. देणगीच्या बाबतीत केंद्रातील सत्ताधारी भाजप आघाडीवर आहे. २०१४-१५ मध्ये पक्षाला एकूण ४३७.३५ कोटी रुपयांचा निधी मिळाला. २०१३-१४ च्या तुलनेत १५६ टक्क्यांनी अधिक आहे. त्यापैकी ९४ टक्के देणगी उद्योग जगताकडून मिळालेली आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, माकप आणि भाकपला मिळालेल्या एकूण देणगीपेक्षाही दुप्पट आहे. त्यांना १८५.०३ कोटी रुपयांचा निधी मिळाला. सहावा राष्ट्रीय पक्ष असलेल्या मायावतींच्या बहुजन समाज पार्टीच्या मते पक्षाला देणगी मिळालेली नाही. ही माहिती धक्कादायक आहे. सर्व पक्षांना मिळून एकूण हजार ६९५ व्यक्ती तसेच संस्था किंवा कंपन्यांकडून देणगी मिळाली आहे. त्यापैकी हजार २३४ अर्थात ७२.८० टक्के भाजपला देणगी मिळाली आहे. सर्व आकडे २० हजार रुपयांहून अधिक देणगीचे आहेत. काँग्रेसची देणगी १३७ टक्के आणि राष्ट्रवादीच्या निधीत १७७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

९३टक्के उद्योग जगताकडून
भाजपला काँग्रेसपेक्षा अधिक : राष्ट्रीयपातळीवरील पक्षांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या अहवालानुसार वर्ष २०१४-१५ मध्ये ९२.६१ टक्के निधीची रक्कम उद्योग विश्वातून मिळालेली आहे. केवळ ७.२९ टक्के वैयक्तिक पातळीवरील देणगी आहे.
काँग्रेसला १४१ कोटी
२०१४-१५दरम्यान काँग्रेसला १४१.३५ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. २०१३-१४ च्या तुलनेत १३७ हून अधिक आहे. राष्ट्रवादीला ३८.८२ कोटी रुपये निधी मिळाला आहे.
पक्षनिहाय निधी, पक्ष देणगी (कोटींत) वाढ
भाजप ४३७. ३५ १५६ टक्के
काँग्रेस १४१.४६ १३७ टक्के
राष्ट्रवादी ३८.८२ १७७ टक्के
माकप ३.४२ ६४ टक्के
भाकप १.३३ ०९ टक्के
एकूण ६२२. ३८ १५१ टक्के.
(divyamarathi)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: