रविवार, २३ नोव्हेंबर, २०१४

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याला दोन महानायक उपस्थित होते. पैकी एकाने आपली प्रतिमा आपली चाहत्यांमध्ये  वाईट होण्याचा धोका असुनही आपले टक्कल लपविले नव्हते. दुसऱ्या महानायकाचे मला माहित नाही. काही वर्षांपूर्वीही हा महानायक स्व. बाळासाहेब ठाकरे यांना भेटण्याकरिता मुंबईला आला असता तेंव्हाही त्याने आपले टक्कल लपविले नव्हते.हाच खरा महानायक. 





गुरुवार, १३ नोव्हेंबर, २०१४


  

" जियो पारसी "च्या वादग्रस्त जाहिराती "   

पारशी समुदायातील घटत्या लोकसंख्येचा प्रश्न हाताळण्यासाठी केंद्र सरकारने 'जियो पारसी' या थिम अंतर्गत या समुदायाला लोकसंख्या वाढीसाठी प्रेरित करणाऱयासाठी काही जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत. परंतु, यातील काही जाहिरातील वादाच्या भोवऱयात सापडल्या आहेत.
एका जाहिरातीत थेट कंडोम न वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्याशिवाय, पारशींनी लग्न करुन मुलांना जन्म दिला नाही तर लवकरच पारशी कॉलनीचे हिंदू कॉलनीत रुपांतर होईल, अशीही एक वादग्रस्त जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
देशाच्या लोकसंख्येत पारशींची संख्या चिंताजनक आहे. आकडेवारीनुसार मुंबईमध्ये फक्त ४० हजार पारशी शिल्लक आहेत. २००१ च्या जणगणनेनुसार ही संख्या ७० हजार इतकी होती. पारशी समुदायाची संख्या कमी असण्याचे प्रमुख कारण त्यांच्यात उशीरा होणारे विवाह. त्याशिवाय अनेक जण अविवाहित राहाण्यालाच पसंती देतात किंवा एकच अपत्य राहु देतात आणि धर्माबाहेर लग्न करण्यामुळे पारशींची संख्या कमी झाली आहे. याच कारणांचा वेध घेऊन 'जियो पारसी' अंतर्गत या जाहिराती तयार करण्यात आल्या आहेत.
जाहिरातीमध्ये चाळीशी पार झाल्यानंतरही आईसोबत राहणार्‍या अविवाहित पुरुषांची 'तुम्ही तुमच्या आई सोबत ब्रेकअप घेण्याची ही योग्य वेळ नाही का?', असे म्हणत  अविवाहित पुरूषांची एकप्रकारे टिंगल उडवण्यात आली आहे. त्याशिवाय योग्य पुरुषाच्या शोधात लग्नाचे वय होऊन गेलेल्या महिलांवरही 'तुमचा बॉयफ्रेंड काय रतन टाटांसारखा यशस्वी होणार आहे? त्याच्या आयुष्याचा निर्णय घेणार्‍या तुम्ही कोण आहात, निकोल किडमन?' असे म्हणण्या आले आहे.
पारशींच्या लोकसंख्येत वाढ होण्याच्या दृष्टीने अल्पसंख्याक मंत्रालयाने २०१३ साली एक योजना तयार केली. त्यासाठी मंत्रालयाने १० कोटी रुपयांचा निधीदेखील मंजूर केला. या योजनेंतर्गत गेल्या दोन दिवसांपासून या जाहिराती सुरु झाल्या आहेत.
'जियो पारसी'च्या जाहिराती-
jiyo-parsi4_page_15_thumbparsi1


(लोकसत्ता)
 

 

बुधवार, १२ नोव्हेंबर, २०१४


दिलीप कुलकर्णी फोन इन्टरनेट वापरत नाहीत. मातीच्या घरात राहतात. वीज फक्त दिव्यांपुरती वापरतात. पंखे वापरत नाहीत. खेड्यात राहतात. टेल्को मध्ये इंजिनियर होते. पर्यावरणपूरक जीवनशैलीने जगतात. लोकांचे प्रबोधन करण्यासाठी " गतिमान संतुलन " हे चार पानी मासिक चालवतात. काळी पांढरी छपाई असते व कुठलीही जाहिरात नसते. कुठल्याही विषयावर ते वेगळाच विचार मांडतात की ज्याबद्दल आपण विचारही केला नसतो. त्यांची पंधरा पुस्तके प्रसिध्द झालेली आहेत. ही पुस्तके उज्ज्वल ग्रंथ भांडार , आप्पा बळवंत चौक , पुणे येथे उपलब्ध आहेत. त्यांना २०११ साली वर्ध्याला डॉ. उल्हास जाजू यांनी जाहीर केलेला त्यांच्या आजोबांच्या नावाने असलेला पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. विकास म्हणजे विनाश या विषयावर ते पूर्ण दिवसाची कार्यशाळा घेतात. पर्यावरण साहित्य संमेलन दापोली येथे कमीत कमी खर्चात घेतले. ते भारताचे मार्क बॉईल आहेत. त्यांच्याशी संपर्क फक्त पोस्टकार्ड द्वारेच होऊ शकतो.

शनिवार, १ नोव्हेंबर, २०१४

पाकिस्तानची आणि भाजपची एकच गोची 

पाकिस्तानमध्ये शाळांमधून इतिहास शिकवतांना काय शिकवावे हा प्रश्न पडतो. स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास शिकवावा तर कॉंग्रेसचा उल्लेख अपरिहार्य होतो त्यामुळे पाकिस्तानात विद्यार्थ्यांना गाळून इतिहास शिकवावा लागतो. भाजपचेही तसेच झाले आहे स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास शिकवायचा म्हणजे कॉंग्रेसचा उल्लेख टाळता येत नाही. त्यामुळे भाजपनेही आता इतिहास गाळून सांगायचे ठरविले आहे. या गाळणीची भोके सोयीची  ठेवली आहेत. त्यातून गांधी, नेहरू सारखी मंडळी खाली पडतात तर पटेलांसारखी काही नावे गाळनीतच राहतात. आता तर लोकेश चंद्र नावाच्या विद्वानाने मोदी हे गांधीजिंपेक्षाही उजवे आणि दैवी अवतार असल्याचा शोध लावला आहे. सूर्य मावळतीला गेलाकी खुज्या माणसांच्या सावल्याही लांब पडतात असे म्हणतात त्याचा प्रत्यय येत आहे. --- राजेंद्र कडू