शुक्रवार, २७ मार्च, २०२०


कोरोनाभयामुळे मिळालेल्या सक्तीच्या एकांतवासातील  वेळ सदुपयोगी खर्च करू या. कोरोनाची सुरुवात चीनमधून झाली. तर एक भारतीय डॉक्टर १९३८साली चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या विनंतीवरून चीनमध्ये तेथील युद्धात जखमी होणाऱ्या सैनिकांवर उपचार करण्यासाठी तेथे गेला होता. गुगलवर तर असा उल्लेख आहे की पाच भारतीय डॉक्टरांना घेऊन जाणारी बोट चीनमधील वुहानच्या हकाऊ बंदरात गेली होती. 
साल १९३८. 
सोलापूरचा एक तरुण मुंबईतील कॉलेजमधील आपले वैद्यकीय शिक्षण आटोपून गावी परत निघाला होता. स्टेशनवर जातांना मध्ये एके ठिकाणी जवाहरलाल नेहरूंचे (तेंव्हा ते पंतप्रधान व्हायचे होते) भाषण सुरु होते. चीनवर जपानने आक्रमण केले होते. चीनने भारतातील राजकीय नेत्यांना जखमी सैनिकांवर उपचार करण्यासाठी भारतीय डॉक्टरांना पाठविण्याची विंनती केली होती. आपल्या भाषणात नेहरूंनी याचा उल्लेख केला. त्या तरुणाने लगेच चीनमध्ये जायचे ठरविले. त्या तरुणाचे नाव डॉ द्वारकानाथ शांताराम कोटणीस. ते व अन्य चार भारतीय डॉक्टरांना चीनमध्ये पाठवण्यात आले. त्यात नागपूरचे डॉ चोळकरसुद्धा होते. अन्य तिघांमध्ये अलाहाबादच्या डॉ एम.अटल  कलकत्त्याहून डॉ.बी.के.बसू व डॉ.देवेश मुखर्जी  हे होते. डॉ कोटणिसांनी जीवाची पर्वा न करता तेथील जखमी जवानांवर उपचार केले. त्यांनी तेथेच एका चिनी मुलीशी लग्न केले. त्यांना एक मुलगा पण झाला. वैद्यकीय सेवा देतांना अथक परिश्रम व विश्रांतीचा अभाव यामुळे १९३८ साली त्यांचा मृत्यू झाला. चीनने त्यांच्या कार्याची दखल घेऊन मरणोत्तर त्यांचा यथायोग्य सन्मान केला. चीनचा कुठलाही नेता भारत दौऱ्यावर आला की कोटणीस कुटुंबियांची ची भेट घेतल्याशिवाय राहत नाही.  त्यांची पत्नी दरवर्षी सोलापूरला यायची. त्यांचा २०१२मध्ये वयाच्या ९६व्य वर्षी मृत्यू झाला. याच विषयावर आधारित व्ही,शांताराम दिगदर्शित यांचा हा चित्रपट. यात डॉ कोटणीसांची प्रमुख भूमिका स्वत: शांताराम यांनीच केली आहे तर चिनी मुलीच्या भूमिकेत  जयश्री आहेत. इतर कलाकर, केशवराव दाते, बाबुराव पेंढारकर हे आहेत. यातील सुरुवातीचा पंधरा वीस मिनिटाचा भाग सोडला तर बहुतांश कथानक चीनमध्ये घडते. मात्र प्रेक्षकांच्या सोयीसाठी सर्व पात्रे हिंदीत बोलतांना दाखविली आहेत. कथा के ए अब्बास, संगीत वसंत देसाई. 

बुधवार, २५ मार्च, २०२०

हुकुमशहाची लक्षणे आणि वस्तुस्थिती 
हुकुमशहा निवडणुका घेत नसतो
इंदिराजीँनी घेतल्या होत्या, १९७७ साली. हुकूमशहाने निवडणूका घेतल्याचं तर त्या थातुरमातुर असतात. 
१९७७ साली त्या गंभीरपणे घेतल्या गेल्या. 
हुकुमशहाचा निवडणुकांमध्ये पराभव होतं नसतो.
इंदिराजींचा झाला होता. निवडणुकीत पराभव  झाला तरी हुकूमशहा सहजासहजी सत्ता सोडत नाही. इंदिराजींनी सोडली.
(१९७७ साली). तरी त्यांना हुकूमशहा म्हणता येईल काय?