बुधवार, ६ डिसेंबर, २०१७

आैरंगझेब परवडला,
:
:
:
:
:
:
तुघलक नको.








गुरुवार, ३० नोव्हेंबर, २०१७

'पॉवर ऑफ पाटीदार'
चित्रपट एक वर्षापूर्वीच
तयार, प्रदर्शनाला परवानगी
नाही. मोदींवरील चित्रपट
गुजरात निवडणुकी पूर्वीच
प्रदर्शित होणार.











शुक्रवार, २९ सप्टेंबर, २०१७

'दो बिघा जमीन',
बिमल रॉय यांचा चित्रपट,
आज दु. ३ वा./रात्री ९ वा.
झी एव्हरग्रीन क्लासिक्स वाहिनीवर.

गुरुवार, २१ सप्टेंबर, २०१७

सोशल मिडिया म्हणजे
डंपिंग ग्राउंड नव्हे,
कचरा निर्माण करुन
अपलोड करु नका.

शुक्रवार, २६ मे, २०१७

तीन वर्षात एकही पत्रकार परिषद घेण्याचे धाडस मोदी साहेब दाखवू शकले नाहीत

कारण त्यांच्याकडे सांगण्यासारखे कमी आणि लपवण्यासारखेच अधिक आहे.

खरच जर स्वतःच्या कामगिरीवर विश्वास असेल तर एक पत्रकार परिषद घेऊनच दाखवावी साहेबांनी.
खोट्यानाट्या जाहिरातबाजीतून जनतेच्या नजरेत धूळफेक करण्यापेक्षा

सामोरे येऊन जनतेच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत.
आहे हिंमत?
डॉ हर्षल कदम यांची पोस्ट.

गुरुवार, १८ मे, २०१७

काल प्रमोद मांडे यांच्या भाषणातून मिळालेली माहिती

ओडिशामधील 'अठरा नाला' नामक पूल मराठयांनी अठराव्या शतकात बांधला. त्यावरून आजही अवजड वाहतूक होते. कटकमध्ये पण एक पूल मराठयांनी बांधला. तोसुद्धा वापरात आहे. कोणार्कचे सूर्यमंदीर वाळूखाली गाडले गेले होते. मराठयांनी ते उत्खनन करून प्रकाशात आणले. तेथील मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर असलेला स्तंभ मराठयांनी काढून पुरीच्या मंदिरात स्थापन केला. 
अठराव्या शतकाच्या सुरुवातीला कलकत्ता हे लहानसे गाव होते. मराठयांच्या वारंवार होणाऱ्या स्वाऱयांपासून संरक्षण व्हावे म्हणून इंग्रजांनी गावाभोवती खंदक खोदला. त्याला मराठा खंदक असे नाव पडले. आजही ते नाव कायम आहे. व त्याभागात राहणारे रहिवाशी आपला पत्ता सांगतांना मराठा खंदक (Maratha Ditch Lane) असा सांगतात.
 

बुधवार, १ मार्च, २०१७

सुमित्रा महाजन मुळच्या महाराष्ट्रातल्या , रत्नांग्रीच्या  ......


लग्न होऊन मध्यप्रदेशात गेल्या.
तिकडे जाऊन त्या हिंदीत बोलायला शिकल्या म्हणून त्या
नगरसेवक, आमदार, खासदार होऊ शकल्या.
महाराष्ट्रात मात्र मराठी न बोलता कुणीही नगरसेवक, आमदार, मंत्री एव्हढेच काय
मुंबईचे शेरीफसुद्धा होऊ शकतो.

तामिळनाडूत कायमचे स्थायिक व्हायचे असेल तर ........ 


तुम्हाला तामिळ आलेच पाहिजे.
तीच परिस्थिती दक्षिणेतील सर्व राज्ये, बंगाल, ओरिसा, ईशान्येकडील सर्व राज्ये एव्हढेच काय आपल्या शेजारच्या गुजरातमध्येही आहे.

शिवाजी गायकवाड तामिळ शिकला म्हणून सवाई महानायक होऊ शकला.
महाराष्ट्रात मात्र तुम्ही मराठी न येता नगरसेवक, आमदार, मंत्री आणि महानायक सुद्धा होऊ शकता.

समोरच्याने अमुक एक भाषाच बोलावी असा माझाही आग्रह नसतो. पण,


त्यानेही 'माफ किजिये मुझे मराठी नही समजती, कृपया हिंदीमे बात किजिये.'
असे म्हणू नये अशी माफक अपेक्षा ठेवतो.

प्रश्न मराठीच्या अपमानाचा नाही, उपेक्षेचा आहे.
मराठीत उदघोषणा, संचलन नाही केले तरी चालते,
मराठीत पाट्या नसल्या तरी चालतात असे (महाराष्ट्रात) मराठीला गृहीत धरणे चालू आहे.

पाहुण्यांची सोय दोन दिवसच पहायची असते.

कायम मुक्कामी आलेली व्यक्ती पाहुणा नसते.

मराठी भाषेच्या उपेक्षेमुळे मराठी संस्कृती कोपरयात ढकलली जात आहे.

आपल्या (मराठी माणसाच्या) या उदार धोरणामुळे 

 

एक दिवस महाराष्ट्रातून मराठीच हद्दपार होईल कारण

दोन अनोळखी मराठी माणसे भेटली की त्यांचे संभाषण हिंदीतून सुरु होते व काही  वेळाने जरी असे कळले की आपण दोघही मराठी आहोत तरी
तेथे एखादी अमराठी व्यक्ती हजर असली तर या दोघांवर मराठीत न बोलण्याचे एवढे दडपण येते की ते मराठीचा 'म' देखील उच्चारत नाहीत.

अशामुळे कालांतराने मराठी ही फक्त घरात बोलण्याची भाषा होईल.

आणि तुमची मुले जर ईग्रजी माध्यमाच्या शाळांमधून शिकत असतील तर ……?
माझ्यासाठी वर्षाचे ३६५ हि दिवस मराठी दिन
सर्व भाषा ह्या बहिणी आहेत. पण मला वाटते माझ्या आईची स्थिती (महाराष्ट्रातच) चिंताजनक आहे . म्हणूनच तर आम्हाला मराठी दिन साजरा करावा लागतो ना ?

त्यामुळे आधी माय मराठी माय व नंतर हिंदी मावशी. आधी माय जगो नंतर मावशी(ही) जगो.

तेंव्हा माझी अशी सूचना आहे की

आपल्या हिंदीभाषिक मित्र, मैत्रिणींशी नेटाने ३६५  दिवस मराठीत बोलून पहा आणि

आपला अनुभव माझ्यासोबत व इतरांसोबत वाटून घ्या.
 (ताजा कलम - मी शिव सैनिक नाही.)

शुक्रवार, २४ फेब्रुवारी, २०१७

अमरावतीमध्ये सायन्स कोअर मैदानावर सुरु असलेल्या लोपामुद्रा नृत्य महोत्सवातील एक घटना
राजस्थानातील कालबेलिया हा नृत्यप्रकार जगप्रसिद्ध असून हे कलावंत असे काही देहभान विसरून कला सादर करतात की कोणीही थक्क होईल. अशीच एक नर्तकी व्यासपीठाच्या पडद्याआड आपल्याला तान्हुल्याला ठेऊन नृत्य करण्यासाठी आली. सुमारे २० मिनिटे तिचे नृत्य सुरू होते. ही २० मिनिटे तिचे तान्हुले रडत होते. जोवर नृत्य संपत नाही तोवर तिचे बाळाकडे लक्ष नव्हते. नृत्य संपल्यानंतर त्या मातेने बळाला आपल्या छातीशी कवटाळले. 
(दिव्य मराठी)
महाऋषी श्रद्धेय संत वासुदेव महाराज

महाराष्ट्रातील वारकऱ्यांचे उर्जास्थान महाऋषी वारकरी रत्न श्री संत वासुदेव महाराज यांचा जन्म अकोट तालुक्यातील अकोली जहाँगीर येथे २३ फेब्रुवारी १९१७ रोजी झाला. महाराजांचे जन्मनाव देवेंद्र देव असे होते. भास्कर महाराज समाधी मंदिराचा जिर्णोद्धार त्यांनी केला. मामा दांडेकर गौरीशंकर महाराजांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. शेत स. नं. श्रीक्षेत्र अकोली जहागीर येथील संत गजानन महाराजांनी सजल केलेल्या विहिरीच्या जिर्णोद्धाराचे काम पूर्ण केले. संत गजानन महाराज संत भास्कर महाराज यांची जिथे ऐतिहासिक भेट झाली तिथे मंदिराची निमिर्ती केली. संत तुकाराम हे वासुदेव महाराजांचे भावविश्व होते. त्यांचे विचार सामान्य माणसाच्या मनात खोलवर रुजवण्याचे मोठे कार्य अविरत सुरू आहेत. यावर्षी महाराजांचा १०० वा जयंती महोत्सव श्रद्धासागर अकोट येथे साजरा होत आहे.
गु रुमाऊली संत वासुदेव महाराजांनी वयाच्या व्या वर्षी पहिले किर्तन केले. त्यांचे संस्कृत भाषेवर प्रभुत्व होते. नऊ वर्ष ज्ञानर्जनासाठी पंढरपूर, आळंदी, बनारस याठिकाणी भ्रमण केले. ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवर माळ ठेवून त्यांनी ज्ञानेश्वरांना गुरू मानले. ज्ञानेश्वरदास या नावाने त्यांनी ३७ दिव्य ग्रंथाची निर्मिती केली.
श्री गजानन विजय या ग्रंथाला पुष्टी देत ऐतिहासिक घटनांचा सरकारी कागदपत्रांचा सखोल अभ्यास करून श्री संत गजानन महाराजांचे संपूर्ण चरित्र हा ग्रंथ त्यांनी लिहिला. महाराजांनी चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण दोनशे उपपुराण उपनिषदांचा सखोल अभ्यास केला. वारकरी संप्रदाय टिकून राहण्यासाठी त्यांनी अडगाव येथे वारकरी प्रशिक्षण केंद्र उघडले तसेच संताच्या कार्याला उजाळा देण्यासाठी सखोल संशोधन करून दाखले मिळवून शासनाला दखल घेण्यास भाग पाडले. पंढरीचे विठ्ठल मंदिर केवळ वारकऱ्यांचे आहे. बडवेशाही नको म्हणून सत्तर पाने माहिती नाडकर्णी कमिशनकडे पाठवून पंढरी मुक्त केली.
दत्त घाटाच्या पंढरपूर चार पायऱ्या वाहून गेल्या असत्या लहान अधिकाऱ्यापासून ते राष्ट्रपतीपर्यंत अर्ज करून महाराजांमुळे दत्तघाट पायऱ्यांचे बांधकाम झाले. आळंदी येथील सिद्धबेट काही प्रवृत्तींनी बळकवण्याचा प्रयत्न केला. परंतु, महाराजांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत एेतिहासिक पुरावे देऊन सिद्धबेट मुक्त केले.
हे कार्य अविरत सुरू असताना संत वासुदेव महाराज आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे गेले असता तेथील संत गजानन महाराज यांच्या मठात त्यांनी जुलै २००९ रोजी रात्री १० वाजता देहत्याग केला. महाराजांचे कार्य अविरत सुरू रहावे याकरिता महाराजांच्या आशिर्वादाने अकोटातील दर्यापूर मार्गावर श्री क्षेत्र श्रद्धासागर याठिकाणी संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेची निर्मिती वारकरी भवन अध्यात्मिक सामाजिक सेवा केंद्र उभारण्यात आले आहे.
अध्यात्म
अॅड. सुभाष हिंगणकर, अकोटमो. ९८८११६३३३८