रस्त्यावर काडी दिसली तरी इथे लोकांना लाज वाटते...
| ||
मेघालयात आहे आिशयातील सगळ्यात स्वच्छ गाव
| ||
मेघालयाची राजधानी शिलाँगपासून ८० किलोमीटर लांब डाउकी महामार्ग अाहे. येथून डावीकडे गेल्यावर सलग १८ किलोमीटरपर्यंत रस्त्याच्या दाेन्ही बाजूंनी शेतांमध्ये फुलझाडांमध्ये वापरण्यात येणारे गवत लावलेले दिसून येते. रस्त्यात डोळ्यांचे पारणे फेडणारी हिरवळ दिसते. बांगलादेश सीमेजवळ तमालपत्राची झाडे असणारे एक लहान गाव येते. हे काही साधारण गाव नाही. हे देशातीलच नव्हे तर आशियातील सर्वात स्वच्छ समजले जाणारे मावल्यान्नांग गाव अाहे. देशात चाैथे स्वच्छ सर्वेक्षण सुरू अाहे. त्यामुळे 'दिव्य मराठी' गावातील स्वच्छता पाहण्यासाठी पाेहाेचला. सन २००३ मध्ये प्रसिद्ध मासिक 'डिस्कव्हर'ने या गावास देशातील सर्वात स्वच्छ गाव घोषित केले. त्या वेळी मेघालयाच्या ईस्ट खासी हिल्स जिल्ह्यातील हे गाव चर्चेत अाले. त्यानंतर २००५ मध्ये मासिकाने या गावाला आशियातील सर्वात स्वच्छ गावाचा किताब दिला. निर्मल भारत किंवा स्वच्छ भारत अभियानापूर्वीच ईश्वराचा बगिचा (गाॅड्स अाेन गार्डन) असणाऱ्या या गावास आशियातील सर्वात स्वच्छ गावाचा सन्मान मिळाला. गाव इतके प्रसिद्ध झाले की अाता देश-विदेशातील पर्यटकांसाठी हे टुरिस्ट स्पाॅट बनले. स्वच्छ गावाच्या प्रचारामुळे गावातील प्रत्येक दुसऱ्या घरात हाेम काॅटेज अाहे. जवळपास ५५० लोकसंख्या अाणि ९८ घरे असणाऱ्या या गावात स्वच्छता म्हणजे लाेकांसाठी एक मिशन अाहे. स्वच्छतेस सुंदरतेकडे घेऊन जाणाऱ्या या गावासाठी प्रत्येक व्यक्ती अापले याेगदान देत अाहे. गावातील ज्येष्ठांपासून लहान मुलापर्यंत सर्व जण अापले घर, गाव स्वच्छ ठेवत अाहेत. महिलांचे वर्चस्व मानणाऱ्या खासी जमातीच्या या गावात राेज पाच व्यक्ती रस्त्यावर पडलेले प्रत्येक पान उचलतात. रस्त्यावर अागपेटीची काडी सापडणे ही येथे लज्जास्पद वाटते. आठवड्यातील एक दिवस गावातील सर्व जण रस्ता झाडून काढतात. उर्वरित. महिला विश्व पानावर मावल्यान्नांग गावातील मुख्य रस्ता नेहमीच असा चमकत असतो. छायाचित्र : ओ. पी. सोनी मावल्यान्नांगमधून थेट रिपोर्ट प्राथमिक शाळेच्या शिक्षकाने केली स्वच्छतेची सुरुवात गावाचे सरपंच (स्थानिक भाषेत त्यांना रंग्बा शेनाॅग म्हणतात) बंजोपथ्यू खरंबा सांगतात की, अामच्या गावात शंभर टक्के साक्षरता अाहे. सर्व घरांमध्ये पाइपलाइनने पाणीपुरवठा हाेताे. गावात एक पाेस्ट अाॅफिस, कम्युनिटी हाॅल, चर्च, मेघालय पर्यटन मंडळाचे कार्यालय व गेस्टहाऊस अाहेे. पर्यटकांशी गावकरी इंग्रजीत संवाद साधतात. शेती हे गावाचे उत्पन्नाचे मुख्य साधन हाेते. परंतु स्वच्छ गावाचा पुरस्कार मिळाल्यानंतर पर्यटकांची संख्या सतत वाढत अाहे. स्वच्छतेची सुरुवात कशी झाली, या प्रश्नावर खरंबा म्हणतात, १९८८ मध्ये प्राथमिक शाळेच्या शिक्षकाने स्वच्छतेची सुरुवात केली. सर्वात अाधी गावातील प्रत्येक घरात शौचालय बनवले गेले. १९८९-९० मध्येच गावातील प्रत्येक घरात शौचालय झाले हाेते. |
शनिवार, २९ डिसेंबर, २०१८
बुधवार, २८ नोव्हेंबर, २०१८
मंगळवार, २७ फेब्रुवारी, २०१८
१९२ ग्रामपंचायत निवडणूक;
४३२ ग्राम सदस्यांचे पद रिक्त राहणार
(लोकसत्तामधून)
नक्षलवाद्यांच्या दहशतीला घाबरू नका, लोकशाही व्यवस्थेवर विश्वास दाखवतानाच मतदान प्रक्रियेत सहभागी व्हा, असे आवाहन जिल्हा पोलीस दल, जिल्हा प्रशासनासोबतच विविध सामाजिक संघटना करत असल्या तरी या जिल्हय़ात त्याचा काही एक परिणाम दिसून येत नसून ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १९२ ग्रामपंचायतीत एकाही उमेदवाराने नामांकन अर्ज दाखल न केल्याने ४३२ ग्राम सदस्यांचे पद रिक्त राहणार आहेत.
एका पाठोपाठ एक जहाल नक्षलवादी आत्मसमर्पण करीत असले तरी गडचिरोली जिल्हय़ात अतिदुर्गम भागातील आदिवासींच्या मनातून काही केल्या नक्षलवाद्यांची दहशत व भीती कमी होत नसल्याची बाब पुन्हा एकदा प्रकर्षांने समोर आली आहे. गडचिरोली जिल्हय़ात आज मंगळवारी ग्रामपंचायत निवडणूक व पोटनिवडणूक होत आहे. यामध्ये १९२ ग्रामपंचायतीत एकाही उमेदवाराने नामांकन दाखल केलेले नाही. राज्य निवडणूक आयोगाद्वारे १६ ग्रामपंचायतीत नियमित निवडणूक तसेच २०७ ग्रामपंचायतमध्ये उपनिवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली. यासाठी ५ ते १२ फेब्रुवारी या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ दिली होती. १६ ग्रामपंचायतमध्ये सरपंचासोबत १३६ पदांसाठी निवडणूक जाहीर केली. मात्र, एकापेक्षा अधिक उमेदवारांनी नामांकन दाखल न केल्यामुळे ४७ सदस्यांना बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले, तर ४२ पदांसाठी एकही उमेदवारी अर्ज न आल्यामुळे ही सर्व पदे रिक्त राहणार आहेत. तसेच ४७ पदांसाठी मतदान प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासोबतच २०७ ग्रामपंचायतीच्या ५१९ जागांसाठी उपनिवडणुकीची घोषणा करण्यात आली. मात्र, त्यातही ३९० जागांसाठी एकाही उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला नाही, तर १०५ उमेदवारांची अगोदरच बिनविरोध निवड करण्यात आली. त्यामुळे आता केवळ उर्वरित २४ जागांसाठी मतदान प्रक्रिया राबवण्यात येत आहे. एकूणच नक्षलवाद्यांच्या दहशतीमुळे १९२ ग्रामपंचायतीत ४३२ पदे रिक्त राहणार आहेत. तसेच १०६ उमेदवार हे बिनविरोध निवडून आले आहेत. एकूणच या निवडणूक प्रक्रियेवरून आपण अंदाज लावू शकतो की, गडचिरोली या जंगलात नक्षलवाद्यांची दहशत किती आहे. गावातील लोक साधी निवडणूक लढण्यासाठी सुद्धा समोर येत नाहीत. नक्षलवादी सांगतील तोच उमेदवार येथे नामांकन अर्ज भरतो. त्यातही नक्षलवाद्यांच्या मनात आले तर ते कुणालाही नामांकन भरू देत नाहीत.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)

