सोमवार, २९ जून, २०२०

गुप्तहेराने केलेली कामगिरी त्याच्या हयातीत प्रसिद्ध करू नये असं म्हणतात. मग ती कामगिरी पाकिस्तानातील असली तरी आणि ती अजित डोभाल यांनी केलेली असली तरीही . त्यामुळे इतर हेरांना काम करणे कठीण जाते. कारण हेरगिरीच्या पद्धती शत्रू राष्ट्राला माहित होतात. 
अनुपम खेर व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. किरण खेर आपले चित्रपटांचे मानधन फक्त पांढऱ्या पैशातच घेतात काय?

शनिवार, २७ जून, २०२०

१९६२ चे युद्ध विसरू नका असा सल्ला महाराष्ट्राच्या राजकारणातल्या "भीष्म पितामहां'नी राहुल गांधींना दिला आहे. १९६२चा इतिहास लक्षात ठेवायचा तर मग "१९६५चा इतिहास की जेंव्हा भारतीय सैन्याने लाहोरला वेढा घातला होता आणि १९७१चा इतिहास जेंव्हा भारताने पाकिस्तानकडून लेखी शरणागती घेतली होती व ९३००० (त्र्याण्णव हजार) पाकिस्तानी सैनिक युद्धबंदी  ताब्यात घेतले होते आणि पाकिस्तानची फाळणी घडवून आणून बांगलादेशची निर्मिती केली होती", हा इतिहास सुद्धा लक्षात ठेवावा लागेल. बिग बी सारख्या सुपरस्टारचा प्रत्येक सिनेमा हिट झालेला नाही. धोनीने प्रत्येक सामना जिंकलेला नाही. सचिन तेंडुलकरने प्रत्येक चेंडूवर षटकार मारलेला नाही, गोलंदाज प्रत्येक ओव्हरमध्ये बळी घेत नाही. वाजपेयींसारखा लोकप्रिय नेता प्रत्येक निवडणूक जिंकलेला नाही. त्याचप्रमाणे प्रत्येक युद्ध जिंकलेच पाहिजे असे नाही. महाराष्ट्रातील जनता खंजीर खुपसण्याचा इतिहास विसरून एकत्र आलेच ना?

गुरुवार, २५ जून, २०२०

आतापर्यंत कुणीही दुसरा गांधी होऊ शकला नाही. ....
बरेचदा काही व्यक्तींचा दुसरा गांधी, तिसरा गांधी असा उल्लेख वाचण्यात येतो. मात्र गांधीजींच्या जवळपासही पोहोचणारा कुणी दिसून येत नाही. १९७४-७५ मध्ये विरोधी पक्षाने जयप्रकशजींना वापरून घेतले. आणि २०१३-१४ मध्ये विरोधी पक्षाने अण्णांना वापरून घेतले. अण्णा बाळबोध होते. ते पण लोकनायक यांनाही परिपक्वता दाखविता आली नाही. सैनिक व पोलिस याना वरिष्ठांचे 'अयोग्य' वाटणारे आदेश न पाळण्याचे आवाहन त्यांनी केले होते. त्याचे काय दुष्परिणाम होतील याची त्यांनी विचार केलेला दिसला नाही. गांधीजींनीही परकीय सत्ता असून असे आवाहन केले नव्हते. ज्याना परकीय सत्ता आवडत नव्हती ते स्वत:हून आपल्या नोकर्या/शिक्षण सोडून स्वातंत्र्य चळवळीत भाग घेत होते. सैनिक पोलिसांना राजकीय आवाहन करणे चुकीचे आहे. मोदींनीसुद्धा निवडणूक प्रचारात कॉंग्रेस सरकार तुमची काळजी घेत नाही असे माजी सैनिकांच्या मेळाव्यात म्हटले होते. अर्थात मोदींकडून आम्ही परिपक्वतेची अपेक्षाही करत नाही. पण लोकनायकांकडून ही अपेक्षा नव्हती. लोकनायक हे थोर पुरुष होते पण थोर पुरुषही चुका करतात. त्यांना नंतर त्याबद्दल पश्चातापही झाला असेल पण त्यांनी तसे जाहीरपणे कबुल केले नाही. याबाबतीत गांधीजी मात्र प्रांजळपणे आपल्या चुका काबुल करायचे. नजीकच्या भविष्यात तरी दुसरा किंवा तिसरा गांधी होणे शक्य नाही. जो आपल्या अनुयायांच्या जयघोषात वाहून जातो तो गांधी होऊ शकत नाही. अनुयायांचा विरोध पत्कारणाराच गांधी होऊ शकतो.
जयप्रकाशजींनी बांधलेले हे गाठोडे २८ महिन्यातच सुटले. व ज्यांची हुकुमशहा म्हणून संभावना करण्यात आली होती त्या इंदिराजी प्रचंड बहुमताने १९८० साली पुन्हा पंतप्रधान झाल्या.

Rajkumar More, Ramakant Gohane and 4 others

१९७५ च्या आंदोलनात लोकनायक जयप्रकाशजी यांनी "पोलिस व लष्करातील सैनिक यानी त्यांच्या वरिष्ठांचे त्यांना चुकीचे वाटणारे आदेश पाळू नये" असे आवाहन केले होते. तरीही इंदिराजींनी त्यांना देशद्रोही म्हटले नाही किंवा त्यांच्यावर देशद्रोहाचे कलम लावण्यात आले नाही.

गुरुवार, १८ जून, २०२०

सातव्या शतकात भारत भेटीवर आलेला चिनी प्रवासी ह्यू-एन-त्सांग मोदीजींच्या गावाला भेट देऊन नंतर प्रेसिडेंट झी जिनपिंग यांच्या गावाला गेला होता?
बॉलिवूडमध्ये घराणेशाही?
अशक्य. तिथे गांधी आडनावाचं कुणीच नाही. घराणेशाही म्हणजे गांधी 

मंगळवार, ९ जून, २०२०

काही राष्ट्रीय महत्वाच्या बातम्यासुद्धा काही वाहिन्या दाखवत नाहीत किंवा मग 'चटश्राद्ध' करतात घोळूनघोळून दाखवत नाहीत.  'मोठी बातमी', ब्रेकिंग न्यूज वगैरे असं काही पुकारा होत नाही. यालाच अनुल्लेखाने मारणे असे म्हणतात काय 
पूर्वी वर्तमानपत्रात एखादी बातमी छपून आणायची म्हणजे एखाद्या ओळखीच्या पत्रकारांशी संधान साधावे लागत असे. नंतर पेड न्यूजचा जमाना आला आणि आता वृत्तवाहिन्यांमध्ये "पेड नो न्यूज" म्हणजे एखादी गैरसोयीची बातमी न दाखविण्यासाठी ...... अपवाद मुद्रित माध्यमे. ती मात्र थोडीफार ताळ्यावर आहेत. 

रविवार, ७ जून, २०२०

जॉर्ज फ्लॉयडचा मारेकरी माजी पोलीस अधिकारी डेरेक चॉवीनची बायको म्हणते ...... जॉर्ज फ्लॉईडच्या मृत्युमुळे मला मोठा धक्का बसलायं... आणि माझ्या पतीकडूनच हे कृत्य घडल्यामुळे माझी मानसिक स्थिती पार बिघडली आहे. अशा माणसासोबतची असलेली माझी ओळख मला पूर्णपणे पुसून टाकायची आहे आणि म्हणूनच मी न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला आहे... हे उद्गार आहेत केली चाऊविनचे.

शनिवार, ६ जून, २०२०

राष्ट्र कणखर नको तर लवचिक असावे. कणखर राष्ट्र मोडून पडू शकते-यु आर अनंतमूर्ती. जर्मनीला गतवैभव प्राप्त करून देईल असे म्हणणाऱ्या हिट्लरमुळे जर्मनीचे दोन तुकडे झाले एव्हढेच नव्हे तर राजधानी बर्लिन शहराचेसुद्धा दोन तुकडे झाले व अर्धे बर्लिन शहर पूर्व जर्मनीत तर अर्धे शहर पश्चिम जर्मनीत गेले. 
हिटलर स्वतःला आर्य वंशाचा म्हणवून घ्यायचा. त्याच्या नाझी पक्षाचे चिन्ह स्वस्तिक हे होते. त्याने संपूर्ण युरोपमधील ६०लाख ज्यूंना गॅस चेम्बर मध्ये कोंडून ठार केले.  त्यात मुले महिला, वयोवृद्ध, दिव्यांग यांचा समावेश होता.  हिटलरला या दुष्कर्माची शिक्षा मिळू शकली नाही कारण दुसऱ्या महायुद्धात प्रभाव समोर दिसताच त्याने आत्महत्या केली. मात्र त्याच्या १२ सहकाऱ्यांवर खटला भरल्या गेला व मृत्यूदंड दिल्या गेला. काहींना आजन्म कारावास तर काहींना जन्मठेप झाली. हिटलरच्या या कृत्यामुळे युरोपमध्ये स्वस्तिक चिन्हाचा दुस्वास करण्यात येतो. कुठेही स्वस्तिक चिन्ह दिसले की त्याची मोडतोड करण्यात येते.