रविवार, २४ जानेवारी, २०१६

Bag भरो और निकलो ……


शेतकऱ्यांसाठी खरंच ज्यांना काहीतरी करावेसे वाटते त्यांनी वर्षाचे किमान ३०० दिवसांकरिता  २४X७ आपले बस्तान एखाद्या गावात हलविणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांचे खरे प्रश्न समजून घेता  येतील. नुसते सोहळे आयोजित करून काही साध्य होईल असे वाटत नाही. म्हणतात ना की कोळ्यांना आयते मासे देऊ नका त्यांना जाळी द्या. आयते मासे दिले तर एक दिवस पोट भरेल जाळ दिलं तर त्याची कायमची ददात मिटेल. कारण हा आजार तात्पुरता नसून जुनाट आहे. जेंव्हा दुष्काळ नसतो तेंव्हाही शेतकऱ्यांची लूट होतच असते. त्यामुळे ग्रामीण भागात कधी आधिक्य (surplus) निर्माणच झाले नाही. महाराष्ट्रातील हजारो खेडी स्वत:ला असे गाडून घेणाऱ्या कार्यकर्त्यांची वाट पाहताहेत. पाहुणे म्हणून येऊ नका. कायमचे राहायला या. पाहुणे म्हणून तर शेतकरयांचे नोकरीवर असलेले भाऊसुद्धा दरवर्षी वर्षातून दोनदां येतातच की.
तेंव्हा वीणा पाटलांच्या भाषेत सांगायचे तर, Bag भरो और निकलो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: