शनिवार, २ जानेवारी, २०१६

देवाला का वेठीस धरता ?


शिरडीच्या साईबाबांचे मंदिर नववर्षानिमित्त रात्रभर उघडे होते असे कळले. मंदिर व्यवस्थापन व भक्तांनी थोडा देवांचाही विचार करायला करायला हवा. भक्तांच्या सोयीसाठी देवाला रात्रभर जागरण करायला लावणे कितपत योग्य आहे. फक्त महाराष्ट्रातच हा प्रकार आढळून येतो. राज्यातील बहुतेक मंदिरे भल्या पहाटेच उघडतात व रात्री उशिरापर्यंत उघडी असतात.
संपूर्ण दिवसभर देवाला भक्तांकडे दया दृष्टीने पहावे लागते, पापणीसुद्धा लववू न देता. हो एखादा भक्त त्याच्यावर कृपादृष्टी न पडता निघून गेला तर. देवालाच भक्ताची काळजी.
इतर प्रांतात मात्र देवाला अधूनमधून विश्रांती मिळावी म्हणू मंदिराचे दरवाजे बंद करण्यात येतात. देवाची आंघोळ, भोजन, विश्रांती ह्या वेळा पाळल्या जातात. पुरोगामी महाराष्ट्रात मात्र देवाला वेठीस धरल्या जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: