रविवार, २४ जानेवारी, २०१६

पणतू  विरुद्ध पणतू .............

सावरकरांचे पणतू रणजीत सावरकर हे सावरकरांवर असलेला गांधी हत्येचा डाग कायमचा पुसून टाकल्या जावा यासाठी कोर्टात जाणार आहेत. सावरकरांना गांधीहत्या प्रकरणात निर्दोष सोडण्यात आले होते. (असे असले तरी १९६६ साली नेमण्यात आलेल्या कपूर आयोगाने तपास अधिकारी जे डे नगरवाला यांचेवर उपलब्ध पुराव्यांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवला होता).  तर तिकडे महात्माजींचे पणतू हे वारंवार आपल्या ठीकठिकाणी दिलेल्या भाषणात  "गांधीहत्येच्या आरोपातून सावरकरांना दोषमुक्त करता येणार नाही"  असे सांगत असतात. एकूणच पणतू विरुद्ध पणतू असा सामना रंगणार असा रंग दिसतो. (ताजा कलम- तुषार गांधी यांचे भाषण अमरावती येथे दिनांक ६ फेब्रुवारी रोजी, सायं. ६ वाजता, मातोश्री विमलताई सभागृह)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: