मुस्लिम देश तरीही ……….
धर्मनिरपेक्षतेला चालना मिळावी म्हणून प्रयत्न करणारे राष्ट्रपती अशी रहेमान. अरबी पद्धतीची नावे ठेवण्यावर बंदी.
अतिरेक्यांसारखे दिसतात म्हणून लोकांची १३ हजार लोकांची दाढी काढली! चेहरा झाकून जाणाऱ्या ८९ महिलांना ताब्यात घेतले
| ||
देशातील खतलून विभागाचे पोलिस प्रमुख बहरोम शरीफजादा यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी १७०० हून अधिक महिला-मुलींना समजावून सांगत स्कार्फ घालण्यापासून परावृत्त केले आहे. एवढ्यावरच ही कारवाई थांबलेली नाही. पारंपरिक मुस्लिम कपडे विकणाऱ्या दुकानदारांना ही दुकाने तत्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, पोलिसांनी हा आदेश लागू होताच चेहरा झाकून जाणाऱ्या ८९ महिलांना ताब्यात घेतले आहे. या महिला शरीरविक्रय करणाऱ्या असल्याची माहिती आहे. या सर्व आदेशांना राष्ट्रपती अमोमाली रहेमान यांनी मंजुरी दिली आहे. धर्मनिरपेक्षतेला चालना मिळावी म्हणून प्रयत्न करणारे राष्ट्रपती अशी रहेमान यांची ओळख आहे. मुस्लिम देश तरीही... ताजिकिस्तानहा खरे तर मुस्लिम देश आहे. मात्र, एक धर्मनिरपेक्ष देश म्हणून त्याची ओळख आहे. गेल्या आठवड्यात अरबी पद्धतीची नावे ठेवण्यावरही बंदी घालावी या प्रस्तावाला संसदेत बहुमताने मंजुरी दिली होती. सरकारी आदेशानंतर देशातील १३ हजार लोकांची दाढी पोलिसांनी काढली. {रहेमान१९९२ पासून देशाचे प्रमुख म्हणून काम पाहत आहेत. { १९९४ पासून ते राष्ट्रपतिपदावर विराजमान आहेत. { २०२० मध्ये रहेमान यांचा कार्यकाळ संपत आहे. |
शुक्रवार, २२ जानेवारी, २०१६
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा