याचे श्रेय निवडणूक आयोगालाच द्यावे लागेल.
गेली पंचवीस वर्षे " रुक्मिणीनगर (अमरावती)पोस्टाच्या इमारतीची नियोजित जागा अशी पाटी पाहत असलेल्या ठिकाणी बांधकाम सुरु झाले आहे. याचे सर्व श्रेय निवडणूक आयोगालच द्यावे लागेल.
आयोगाने सतत तीन निवडणुका (महापालिका, लोकसभा, विधानसभा) घेतल्यामुळे हे शक्य झाले.
या निवडणुकांमुळे गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या सर्व लहानमोठ्या नेत्यांनी या प्रश्नात लक्ष घातले व प्रश्न धसास लागला.
आता परत २०१७ मध्ये महापालिका निवडणुका आहेत.
शिवाय लोकसभा/विधानसभेच्या मध्यावधीचेही काही सांगता येत नाही.
कारण २०२४ सालापर्यंत मीच पंप्रधान आहे असे सांगणारे २४ महिनेतरी टिकतील की नाही काही सांगता येत नाही.
तेंव्हा मतदारांनी त्यांचा एखादा नवीन प्रश्न आतापासूनच शोधून ठेवल्यास तो हमखास सुटेल असे वाटते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा