कोण म्हणतो …, पोलादी महिलेची आणखी एक यशस्वी खेळी. ……… | मोदी सध्या सिक्कीमच्या दौऱ्यावर आहेत. थांबा असे चमकू नका. सिक्कीम भारतातच आहे. मोदींचा हा दौरा परदेश दौरा ठरला असता परंतु त्यांना हा आनंद न मिळू देण्याला इंदिरा गांधीच कारणीभूत आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळाले तेंव्हा ब्रिटीश अमलाखाली असलेल्या सिक्किमने स्वतंत्र राहायचे ठरविले मात्र नेहरूंच्या शिष्टाईमुळे १९५० साली दोन्ही देशांमध्ये करार होऊन सिक्किमने आपले संरक्षण व परराष्ट्र धोरण सांभाळायची जबाबदारी मोठ्या विश्वासाने भारताकडे दिली. | सिक्कीममध्ये संसद स्थापन झाली. मात्र चोग्याल (सिक्कीमचे राजे) हेच प्रभावी सत्ताधारी होते. मात्र १९७३ साल उजाडेपर्यंत लोकमत चोग्यालच्या विरोधात गेले व तेथील पंतप्रधानांनी १९७५ साली आम्हाला ला भारतात सामील करून घ्या अशी भारतीय संसदेला विनंती केली. विनंती केली. इंदिराजींनी लगेच सिक्कीममध्ये आपले सैन्य पाठवून चोग्यालच्या राजवाड्यातील सैनिकांना नि:शस्त्र केले. | नंतर घेतल्या गेलेल्या सार्वमतात सिक्कीमच्या ९७. ५ टक्के जनतेने चोग्यालच्या राजवटीविरुद्ध मतदान केले. पुढे भारतीय संसदेने ठराव पारित करून सिक्किमचे भारतात रीतसर विलिनीकरण करून घेतले व सिक्कीम भारताचे २२ वे घटकराज्य बनले. तेंव्हा शेजारील काही देशांनी (ज्यांचा सिक्कीमवर डोळा होता) यागोष्टीला भारताची विस्तारवादी महत्वाकांक्षा म्हणून कांगावा केला होता. मात्र इंदिराजींनी त्याला धूप घातली नाही. | काश्मिरचे तेंव्हाचे राजे हरिसिंग यांनी १९४७ साली तत्परेतेने भारतात सामील होण्याबद्दल पत्र दिले असते तर काश्मीर प्रश्न चिघळला नसता व जवळजवळ अर्धे काश्मीर पाकिस्तानच्या घश्यात गेले नसते. राजा हरीसिंगांना काश्मीर स्वायत्त ठेवायचे होते पण जेंव्हा घुसखोर उंबरठ्यापर्यंत आले तेंव्हाच त्यांना भारतात सामील व्हायची उपरती झाली. | सिक्कीम स्वतंत्र देश असता तर मोदिजींचा हा आणखी एक परदेश दौरा ठरला असता. | |
सोमवार, १८ जानेवारी, २०१६
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा