रविवार, ३ जानेवारी, २०१६

फळापासून लोणी

 
 दही वा ताक घुसळून लोणी काढतात हे आपण बघितले आहे. मात्र फळातूनच चक्क लोणी काढता आले तर? कल्पना काहीशी मजेदार वाटत असली तरी हे खरे आहे. या फळाचे नाव आहे 'अ‍ॅव्हॅकॅडो'. याला परसिआ अमेरिकाना असेही नाव आहे. अमेरिकेतील मेक्सिको या देशातील हा मूळ वृक्ष आहे. या सदापर्णी वृक्षाला मार्च-एप्रिलच्या दरम्यान फुले येतात. याच्या दोन जाती आहेत. एक पिवळसा गर असलेली दुसरी जांभळा गर असलेली. पिवळसर गराच्या आत ते टक्के तर जांभळट गराच्या आत १५ ते २० टक्के स्निग्धांश असतो. हे झाड लावल्यानंतर १० ते १५ वर्षांत दोन-तीनशे फळे येतात. एकूण बघता या फळात १७ ते २० टक्के स्निग्धांश, इतर फळांच्या तुलनेत दुप्पट प्रथिने, बी-सी-जी जीवनसत्त्वे उपयुक्त क्षार मिळतात. सन १९४१ मध्ये पुण्यातील गणेशखिंड फलोद्यान केंद्रात याच्या लागवडीचा प्रयोग झाला होता. कोडाईकॅनाल परिसरात काही प्रमाणात लागवड वजा जाता म्हणावी तशी मोठ्या प्रमाणात याची लागवड होत नाही. आपल्या देशातील हवामान या वृक्षाच्या लागवडीस योग्य आहे. शिवाय निर्यात करूनही चांगल्या प्रकारचे उत्पन्न मिळू शकते. मोठ्या प्रमाणात याची लागवड केली तर हे फळ नक्कीच लोकप्रिय होऊ शकते. (दिव्य मराठी)

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: