मंगळवार, १९ जानेवारी, २०१६

अच्छी चौकीदारी हो रही हैं ………


पठाणकोट प्रकरणात आपले अपहरण झाले होते अस दावा करणाऱ्या एस पी कडून राष्ट्रीय तपास संस्थेला पुढील माहिती मिळाली. १) एस पी सलविन्दर सिंगला स्मगलर्स कडून त्यांचा माल भारतात आणू दिल्याबद्दल मोबदला म्हणून सोन्याचे दागिने मिळत असत. मिळालेली लाच अस्सल सोन्याचीच आहे कि नाही हे हा एस पी आपल्या सराफ मित्राकडून (याचेही अपहरण झाले होते) तपासून घेत असे.
या स्मगलिंगच्या आडून शस्त्रांची आवक होत नसेल काय. ९३ साली झालेल्या मुंबई बॉंब स्फोटांसाठी वापरलेली सामुग्री अशीच स्मगलिंगच्या आडोशाने आणली गेली होती असे उघड झाले होते व त्यासाठी कस्टमच्या बड्या अधिकाऱ्यांना दोषी धरण्यात आले होते. मला देशाची चौकीदारी द्या म्हणणारे चांगली चौकीदारी करताहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: