गुरुवार, १९ मे, २०१६

कॅनडाने मागितली १०२ वर्षांनी माफी. 


१९१४ साली ३७६ भारतीयांना (३४० शीख, २४ मुसलमान १२ हिंदू) घेऊन "कामागाटा मारू" जहाज Hongkong येथून कॅनडाला घेऊन गेले होते मात्र कॅनडाने त्यातील फक्त २४ जणांना उतरू दिले व उर्वरित प्रवाशांना जहाजात परत पाठवले. प्रवासात त्यांची अन्नान दशा झाली. हे जहाज भारतात कलकत्ता येथे परत आले मात्र जहाजात क्रांतिकारी आहेत असा दावा करून ब्रिटीश अधिकारयांनी  उतरू दिले नाही. बोटीवर गुरदितसिंग व अन्य २० जणांना ताब्यात घेण्यासाठी पोलिस बोटीवर गेले असता तेथे धुमश्चक्री होऊन १९ जन मारल्या गेले. कित्येक जणांना कारावास झाला तर काही जणांना ग्रामकैद (गावाबाहेर पडण्यास मनाई) झाली. गुरदित सिंग फरार होण्यात यशस्वी झाला होता मात्र गांधीजींनी त्याला शरण येउन आपण खरे देशभक्त आहोत हे दाखवून देण्याचे आवाहान केले. त्यानुसार तो शरण आला, त्यास पांच वर्षांचा कारावास झाला.   आपण हे जहाज परत पाठवल्यामुळेच हे सर्व झाले त्याबद्दल कॅनडाने काल भारताची माफी मागितली आहे.या घटनेचे स्मारक कलकत्ता बंदरातील बजबज येथे एक स्मारक १९५२ साली उभारण्यात आले. त्याचे उदघाटन पंतप्रधान यांचे हस्ते करण्यात आले. हे स्मारक कृपाणाच्या आकाराचे आहे व स्थानिक लोक याला "पंजाबी स्मारक" म्हणून ओळखतात

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: