काल प्रमोद मांडे यांच्या भाषणातून मिळालेली माहिती
ओडिशामधील 'अठरा नाला' नामक पूल मराठयांनी अठराव्या शतकात बांधला. त्यावरून आजही अवजड वाहतूक होते. कटकमध्ये पण एक पूल मराठयांनी बांधला. तोसुद्धा वापरात आहे. कोणार्कचे सूर्यमंदीर वाळूखाली गाडले गेले होते. मराठयांनी ते उत्खनन करून प्रकाशात आणले. तेथील मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर असलेला स्तंभ मराठयांनी काढून पुरीच्या मंदिरात स्थापन केला.अठराव्या शतकाच्या सुरुवातीला कलकत्ता हे लहानसे गाव होते. मराठयांच्या वारंवार होणाऱ्या स्वाऱयांपासून संरक्षण व्हावे म्हणून इंग्रजांनी गावाभोवती खंदक खोदला. त्याला मराठा खंदक असे नाव पडले. आजही ते नाव कायम आहे. व त्याभागात राहणारे रहिवाशी आपला पत्ता सांगतांना मराठा खंदक (Maratha Ditch Lane) असा सांगतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा