'ए मेरे वतन के तमाशबीनों..............'
( दिव्य मराठीच्या दिनांक ३१/०१/२०१४/ च्या अंकात जयप्रकाश चौकसे यांनी लिहिलेला लेख )
बडनगर मध्य प्रदेशमध्ये जन्मलेले कवी प्रदीप यांनी या गीताची रॉयल्टी लष्कराने सुरू केलेल्या संस्थेच्या नावावर केली होती. ही संस्था शहीद जवानांच्या विधवांसाठी काम करते. मात्र, अनेक वर्षांपर्यंत संगीत कंपनीने एकही पैसा संस्थेला दिला नव्हता. त्यामुळे कवी प्रदीप यांची मुलगी मितुलने न्यायालयात यासाठी दीर्घ काळ लढा दिला. त्यावर न्यायालयाने आठवडाभरातच संस्थेला रॉयल्टी देण्याचा आणि पुढेही देत राहण्याचा आदेश कंपनीला दिला होता. मितुलच्या नि:स्वार्थ प्रयत्नाने संस्थेला तेव्हा चांगला पैसा मिळाला होता. एवढेच नव्हे, तर या गीताचा वापर एका मोठय़ा निर्मात्याने त्याच्या माहितीपटात केला होता. मात्र, त्याची रॉयल्टीदेखील संस्थेला मिळाली नाही.
27 जानेवारीच्या कार्यक्रमात अमाप पैसा खर्च करण्यात आला; मात्र कवी प्रदीप यांच्या आठवणीत काही पैसा संस्थेला देण्यात यावा, असा विचार भारतीय जनता पार्टीच्या खासदार आयोजकाने केला नाही. आयोजकांनी मितुल यांना आमंत्रित केले होते की नाही, याची माहिती मिळालेली नाही. त्या मुंबईतच राहतात. याच मितुल यांना उज्जैनच्या सरकारी मदत मिळणार्या एका पत्रकाराने त्रास दिला होता, याच कॉलममध्ये त्याचा उल्लेख केल्यानंतर उज्जैनच्या पोलिस अधिकार्याने मितुल यांची दखल घेतली.
मध्य प्रदेशमध्ये जन्मलेल्या कवी प्रदीप यांच्या स्मृती जपूण ठेवण्याचा विचार मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री किंवा संस्कृती सचिव यांनादेखील कधी आला नाही. कमीत कमी बडनगरचे नाव प्रदीप नगर तरी ठेवायला हवे. युद्धाच्या शहिदांसाठी स्मारक बनवण्याचा दावा करणारे लोक स्मारकांसाठी पैसा खर्च करत नाहीत मात्र शहिदांच्या विधवा स्त्रियांसाठी तरी काही करायला हवे. ज्या देशात रेलवे रूळ टाकण्यासाठी लोखंडाची कमतरता आहे त्या देशात भव्य मूर्ती बनवण्यासाठी लोखंडाची वर्गणी केली जात आहे. कारण मरणार्यांच्या सिद्धांताचा आदर न करता त्यांच्या मूर्ती बनवणे राष्ट्रीय छंद झाला आहे आणि बघी जनतादेखील अशा गोष्टीमुळे आनंदित होते.
ज्या काळात लता मंगेशकर यांनी हे गीत गायले त्या वेळी अफवा होती की, आपल्या पत्नीच्या नाराजीमुळे चितळकर रामचंद्र, आशा भोसलेंकडून हे गीत गाउन घेणार होते. नंतर त्यांना काढून लता मंगेशकर यांना हे गाणे गाण्याचे सांगितले. असो, आता त्या अफवांची आठवण करून काही फायदा नाही. मात्र आताच्या या कार्यक्रमात लता मंगेशकर यांनी जवाहरलाल नेहरू आणि इंदिराजी यांच्या आठवणी सांगितल्याबद्दल आनंद वाटत आहे. कवी प्रदीप यांनी 1941 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'किस्मत'साठी 'दूर हटो ऐ दुनियावालों हिंदुस्तान हमारा है' गाणे लिहिले होते. स्वातंत्र्यासाठी लढणारी जनता चित्रपटगृहात या गाण्यावर टाळ्या वाजवत होती. प्रदीप यांनी इंग्रजांच्या सेन्सॉरपासून वाचण्यासाठी गाण्याच्या काही ओळीत जपान आणि र्जमनीवर टीका केली होती. मात्र, त्यांचा मूळ उद्देश देशप्रेमाची भावना जागृत करण्याचा होता. त्या काळातील सामान्य प्रेक्षकांनी गाण्याच्या त्या ओळीकडे लक्ष दिले नाही, फक्त राष्ट्रप्रेमावर आधारित मुखड्याची उजळणी केली. खरं तर, मुखडेच स्मरणात राहतात आणि अंतरे आठवणीत राहत नाहीत. सामान्य जनतेच्या या स्वभावाचा फायदा राजकीय पक्ष उचलतात आणि आपला प्रचार मुखड्याप्रमाणे करतात. शिवाय स्वत:च्या घाणेरड्या अजेंड्याचा अंतरादेखील लपून ठेवता. हा संपूर्ण देशच मुखडा आहे आणि याचे अंतरे जमिनीच्या वरच्या भागात दबून राहतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा