मागच्या सीटवरील चालक ……….
मनमोहनसिंग हे कळसूत्री पंतप्रधान आहेत व सोनिया गांधी मागच्या सीटवर बसून सत्तेचा गाडा हाकतात असा आरोप नेहमीच केल्या जातो. खरे पाहता सांसदीय लोकशाही शासन पद्धतीत पक्षाध्यक्ष्याला खूप महत्वाचे स्थान असते. नेहरू पंतप्रधान असतांना ते नेहमीच काँग्रेस अध्यक्षांशी सल्ला मसलत करत. पुढे इंदिराजींच्या काळात अध्यक्ष व पंतप्रधान ही एकच व्यक्ति असल्यामुळे हे द्वैत संपले. हे सर्व जरी खरे असले तरी आपण एक गोष्ट विसरतो की कुठलाही पक्ष सत्तेवर असला तरी मागच्या सीटवरील चालक नेहमीच कुणीतरी वेगळाच असतो. उदा. शिवसेनेचे जोशी मुख्यमंत्री असतांना रिमोट बाळ ठाकरेंच्या हातात होता. भाजप सत्तेवर असला की पडद्याआडून आरएसएस सूत्रे हलवीत असतो. भाजपचा अध्यक्ष कोण असावा हे सुद्धा रेशीमबाग मैदानावरून ठरविल्या जाते. मग काँग्रेसवरच हा आरोप का ? प्रत्येक पक्षाला एक हायकमांड असते व तशी ती असावीच लागते नाहीतर अराजक माजू शकते. नरेंद्र मोदी हे पक्षाला व संघाला नाकापेक्षा मोती जड व्हावा तसे झाले आहेत व पक्ष व संघ त्यांच्यामागे फरफटत जात आहेत. असे होण्यापेक्षा मागच्या सीट वरील चालक केंव्हाही चांगला.राज्यशास्त्रात असे शिकवले जाते की ब्रिटनच्या घटनेप्रमाणे तेथील पंतप्रधान हा हुकुमशहा ठरावा एवढे अधिकार घटनेने त्याला दिलेले आहेत. तसा हुकुमशहा होणारा पंतप्रधान आम्हाला हवा आहे काय?
राजेंद्र कडू
९४२३१२५२५४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा