शुक्रवार, १४ फेब्रुवारी, २०१४

दुधखुळे नारायण मूर्ती....................

इन्फोसिसचे एकदा निवृत्ती घेऊन पुन्हा प्रमुख पदावर स्वर झालेले नारायण मूर्ती यांनी भ्रष्टाचार रोखण्यासाठी काही उपाय सुचविले आहेत. त्यांनी सुचवलेले उपाय वाचून मूर्ती हे किती दुधखुळे आहेत याची कल्पना येते. नारायण मूर्ती यांनी मोदीन्ना समर्थन व पाठींबा जाहीर केलेला आहे.(हुरळली शेळी लागली लांडग्याच्या मागे) मोदी पंतप्रधान झाल्यासारखेच आहेत. मोदी व भाजप सत्तेवर आल्यानंतर मुर्ती यांना अपेक्षीत सर्व सुधारणा घडवून आणतील यात शंका नाही. त्यामुळे तुम्ही आम्ही काळजी करण्याची गरज नाही. काय आहेत मूर्तींनी सुचवलेले उपाय . 
मूर्तींनी सुचविलेला एक उपाय म्हणजे निवडून आलेल्या राजकीय नेत्यांना भरघोस वेतन द्यावे . याची काय गरज आहे . राजकीय नेत्यांना भरघोस वेतन देण्याची आवश्यकता नाही. ते ज्या पंचतारांकीत सोयी सवलती उपभोगतात, त्याला जनतेची काहीच हरकत नसते. हरकत आहे ती डबोले जमविणे, सात पिढ्यांची तरतूद करणे, अमर्याद सत्तेतून अमर्याद संपती व अमर्याद संपत्तीतून पुन्हा अमर्याद सत्ता मिळविणे या गोष्टींना. मूर्ती असा विचार करतातेत जणू काही ते भारतातील राजकारण्यांना ते ओळखतच नाहीत व राजकारणी म्हणजे कुणीतरी बिच्चारा प्राणी आहे . इतका भोळा सांब इन्फोसिस सारखा मोठा उद्योग सांभाळतो  यावर विश्वास बसत नाही . नोकरशहांना  भरघोस पगार,पंचतारांकित सोयी सवलती देऊनही त्यांची भूक कधी शमतच नाही. अपसंपदा जमविण्यात ते तसूभरही मागे राहिलेले नाहीत. मग राजकारणी तर देशाचे मालक ते नोकरांच्या मागे कसे राहतील.
मूर्ती म्हणतात विकास कामातील दिरंगाईसाठी बाबूंना ही जबाबदार धरावयास हवे. आपल्या काळ्या बेरया उद्योगात राजकारण्यांना बाबूंची साथ हवी असते . नेता आणि बाबू यांची अभद्र युती फेविकॉलने जोडलेली आहे. हि दोस्ती तुटायची नाय . त्यातही कुणालाही जबाबदार ठरविण्याची घंटा बाबू रुपी मांजराने स्वत:जवळच ठेवली आहे ती हिसकावून घेऊन कोण मांजराच्या गळ्यात बांधतो ते पाहू . मूर्ती इतके दुधखुळे असतील असे वाटले नव्हते .
राजेंद्र कडू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: