गुरुवार, २३ एप्रिल, २०१५

भाकड गायी ओझे नव्हे, मोठे वरदान


गोवंशहत्या बंदी कायदा अंमलात आल्यानंतर भाकड गायी गोपालकांसाठी ओझे ठरणार असल्याचे खोटे वृत्त पसरविले जात आहे. वास्तवात नैसर्गिक सेंद्रिय शेतकरी करण्यासाठी इतर जनावरांच्या तुलनेत भाकड गायी वरदान असल्याचे मत झिरो बजेट नैसर्गिक शेतीचे पुरस्कर्ते सुभाष पाळेकर यांनी व्यक्त केले.
पशुधन बचाव समितीच्यावतीने गोवंश हत्या बंदी कायद्यामुळे शेती शेतकऱ्यांचा कसा फायदा होऊ शकतो याबाबत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाळेकर बोलत होते. ते म्हणाले, दुधाळ गावरानी गायींपेक्षा भाकड गायींच्या मलमुत्रातून जमिनीला पोषक असे कोट्यवधी जीवाणू िनर्माण होण्याची क्षमता आहे. कारण दुधाळ जनावरांची उर्जा वासरू, दुध यामध्ये खर्ची पडते. परंतु भाकड जनावरांच्या या उर्जेची बचत होऊन त्यांचे मलमुत्र सेंद्रीय नैसर्गिक शेतीसाठी सर्वाधिक पोषक असल्याचे माझ्या प्रयोगात सिद्ध झाले आहे. ज्या भागात देशी गायींचा वाणवा आहे त्या भागात शेतकऱ्यांच्या आत्महत्या अधिक असल्याचे िदसून येते. त्यामुळे देशी गायींच्या संख्येत वाढ करणे आवश्यक आहे. एका गावरान गायीच्या मलमुत्रातून ३० एकर जमीन सुपीक होऊ शकते. यामुळे ९० टक्के वीज पाण्याची बचत होते. देशी गायींच्या एक ग्राम मलमुत्रातून १५० ते ५०० कोटी जीवाणूंची िनर्मिती होते. परंतु जर्सी, होस्टन आदी संकरीत गायीच्या मलमुत्रात हा कोणताच गुणधर्म नसल्यामुळे गावरान गायी जोपासून त्या वाढविणे आवश्यक आहे. देशी गायी आपल्या शेतीचा कणा असल्यामुळे तो जोपासण्यात पराकोटीचे दुर्लक्ष झाल्यामुळे आज शेतकऱ्यांची दुर्दशा झाली आहे. जीवामृताचा वापर करून नैसर्गिक शेती केल्यास विषाक्त खाद्यान्नापासून देशवासीयांचा बचाव होऊ शकतो असेही पाळेकर म्हणाले.
Contact No. of Shri Subhashrao Palrkar,  09850352742
(From divyamarathi)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: