शुक्रवार, १३ नोव्हेंबर, २०१५

आताच ब्रिटन दौरा करण्यामागचे रहस्य उलगडले!

आज १४ नोव्हेंबर.
आधुनिक  भारताचे शिल्पकार पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती. त्यांना आदरांजली वाहायची पाळी येऊ नये म्हणून मोदींनी भारतातून पलायन केले. इंदिराजींच्या जयंतीच्या दिवशी सुद्धा मोदी भारतात नसतात. आणि कर्तबगार पंतप्रधान इंदिराजींच्या पुण्यतिथीच्या दिवसाला कलाटणी देण्यासाठी आता सरदार पटेलांना पुढे करण्यात आले आहे. इंदिराजींच्या पुण्यतिथीच्या दिवशीच पटेलांची जयंती असते. त्याचा सोहळा मोदी सरकारकडून साजरा केला जातो. नेहरूजी/इंदिराजी यांना विसरावे असे मोदींना वाटत आहे हे नक्की. आणि हो, २६ मे २०१४ ला शपथविधी घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी नेहरुजींची पुण्यतिथी होती मात्र मोदींनी  शांतीवनाकडे ढुंकूनही पाहिले नाही. मोदींच्या परदेश दौऱ्याच्या तारखा अशाच असतात की त्या काळात नेहरुंजी किंवा इंदिराजींची जयंती किंवा पुण्यतिथी येते. नेहरूजी/इंदिराजींच्या बाबतीत मोदींना कमीतकमी तारखांची कसरत तरी करावी लागते. राजीव गांधींना तर मोदींनी अदखलपात्र व्यक्ती ठरविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: