| आनंदी राहायचंय? | मग 'फेसबुक' बंद करा
हॅपीनेस रिसर्च इन्स्टिट्यूटने अभ्यासानंतर म्हटले- फेसबुकचा वापर केल्यास व्यक्ती राहतो खुश
वृत्तसेवा कोपनहेगन
सोशलनेटवर्किंग साइट फेसबुकचा जास्त वापर करूनही तुम्ही आनंदी
नसाल, तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. एका संशोधनानुसार असे लक्षात आले
आहे की, तुम्ही एक आठवडा फेसबुकचा वापर करणे टाळले, तर जास्त आनंदी बनाल.
हॅपीनेस रिसर्च इन्स्टिट्यूटने हे नवे संशोधन डेन्मार्कमध्ये केले आहे.
या संशोधनात १,०९५ लोक सहभागी झाले होते. या लोकांची दोन गटांत विभागणी
केली होती. पहिल्या गटात अशा लोकांना सहभागी केले होते, ज्यांनी फेसबुकचा
वापर सुरूच ठेवला आहे, तर दुसऱ्या गटात अशा लोकांना सहभागी करून घेण्यात
आले की, ज्यांनी फेसबुकचा वापर बंद केला आहे. इन्स्टिट्यूटचे चीफ
एक्झिक्युटिव्ह एम. वाइकिंगने म्हटले आहे की, आम्ही फेसबुकवर यासाठी फोकस
केले याचे कारण असे की, सर्व वयोगटातील लोक या साइटचा सर्वात जास्त वापर
करतात. ज्या लोकांनी फेसबुकचा वापर बंद केला त्यांपैकी ८८ टक्के लोकांनी
आठवड्यानंतर सांगितले की, आम्ही आमच्या जीवनात बेहद खुश आहोत. या तुलनेत
दुसऱ्या गटातील ८१ टक्के लोकांनी खुश नसल्याचे नमूद केले. पहिल्या गटातील
जवळपास ८४ टक्के लोकांनी म्हटले की, त्यांचे जीवन आनंदी झाले आहे, तर
दुसऱ्या गटात असे मानणाऱ्या लोकांची टक्केवारी ७५ टक्के आहे.
दुसऱ्या गटातील लोकांनी खुश नसल्याचे नमूद केले.
लोकांचे
जीवन आनंदी झाले आहे.
लोकांनी म्हटले की, त्यांचे जीवन आनंदी झाले.
लोक जीवनात बेहद खुश आहेत
आनंदी जीवनाचा फाॅर्म्युला
याप्रयोगाच्या शेवटी असा निष्कर्ष निघाला की, फेसबुकचा वापर करणारे लोक
सामाजिक जीवनात आनंदी आहेत. त्यांना लक्ष्य केंद्रित करण्यासाठी कमी
अडचणींना सामोरे जावे लागले. त्या तुलनेत दुसऱ्या गटातील लोकांच्या सामाजिक
जीवनात कोणताही बदल झाल्याचे दिसून आले. अभ्यास करणाऱ्या पथकाच्या
म्हणण्यानुसार, आमची आवश्यकता काय आहे हे लक्षात घेता, आम्ही दुसऱ्याकडे
काय आहे याकडे लक्ष देत आहोत. त्यामुळे अडचणी उभ्या राहतात. अभ्यासाद्वारे
या निष्कर्षापर्यंत पोहोचता येते की, फेसबुक वापरणाऱ्यांच्या तुलनेत
फेसबुकचा कमी वापर करणारे ३९ टक्के लोक आनंदी आहेत.
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा