|
 |
ऑरोविले (तामिळनाडू) ही कथा आशेचा किरण
जागवणारी आहे. २००० ची घटना आहे. इस्रायलचे अविराम राेजीन आणि त्यांची
पत्नी योरिटी यांना भारतातील हिरवाईने भुरळ घातली. केरळमधील वन क्षेत्र
पाहून त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. प्रवास पुढे वाढत त्यांनी
तामिळनाडूच्या ऑरोविलला भेट दिली. येथील पडीक जमीन पाहून मन खिन्न झाले.
लोकांशी संवाद साधल्यानंतर येथील जमीन पिकत नसल्याने लोकांनी स्थलांतर
केल्याचे सांगण्यात आले. यातूनच त्यांना येथील लोकांसाठी काही तरी केले
पाहिजे, याची प्रेरणा मिळाली. या निश्चयातून ते भारतात परतले. ऑरोविलेमध्ये
त्यांनी ७० एकर शेती विकत घेतली. स्थानिक लोकांच्या मदतीने हिरवाई
फुलवण्यासाठी हळूहळू प्रयत्न होऊ लागले. १३ वर्षांच्या अविश्रांत मेहनतीला
फळ मिळाले. त्यांनी पडीक जमिनीवर १८ हजार झाडे लावली. अविराम यांनी नव्या
वनाला साधना फॉरेस्ट असे नाव दिले. विशेष म्हणजे, यामध्ये बहुतांश फळझाडे
आहेत. रोपटे न्याहाळताना अविराम रोजीन. साधना फॉरेस्टमध्ये बनवलेली झोपडी आणि सोलर पॅनल. इन्सेट पर्यावरणानुकूल वातावरणात आयुष्याचा आनंद घेताना देश-विदेशातील पर्यटक. हे ठिकाण पूर्णपणे पर्यावरणानुकूल नैसर्गिक आहे रोजीन
म्हणाले, हा पर्यावरणानुकूल प्रयोग आहे. इथे झोपडी तयार करण्यात आली आहे.
सौर ऊर्जेतून झगमगाट निर्माण करण्यात आला आहे. बायो टॉयलेट तयार करण्यात
आले आहे. जगभरातील साधारण १५० युवा स्वयंसेवक इथे कार्यरत असतात. इथे ते
वृक्षारोपण करून आयुष्याचा आनंद घेतात. हे ठिकाण आकाराला येण्यासाठी
स्थानिक लोकांनी खूप परिश्रम घेतले. यामुळे रोजगारासाठी स्थलांतर होण्याचे
प्रमाण घटले आहे. साधना फॉरेस्टचे हेच उद्दिष्ट होते. घटलेली पाणी पातळी
वाढवण्यावर आम्ही भर देत आहोत. कमी पाण्यामुळे जमीन पडीक होते. त्यामुळे
तलाव, चर खोदून पावसाचे पाणी मुरवले जात आहे. |
या वनात बहुतांश फळझाडे आहेत. उदा. : केळी, नारळाची झाडे आहेत. शाकाहारी किचनमध्ये ऊर्जाबचतीच्या शेगड्या पवनऊर्जेवर चालतात. या संस्थेने हैती आणि केनियामध्ये असे कार्य सुरू केले आहे.
|
रोजीन यांनी गावात लोकांना पडीक जमिनीवर शेतीचे प्रयोग शिकवले. साधना फॉरेस्टमध्ये देश-विदेशातील १५० लोक कायम दिसतात.
|
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा