गुरुवार, ११ मे, २०२३

*विदर्भातून थेट नेपाळ बॉर्डरजवळ जाणारी गाडी विदर्भातल्या कुठल्याही महत्वाच्या रेल्वे स्टेशनवर जात किंवा थांबत नाही.* 

*गाडी क्रमांक १७००५ सिकंदराबाद ते रक्सोल (नेपाळ बॉर्डरला लागून असलेले स्टेशन) ही काजीपेठमार्गे तेलंगणातून विदर्भात प्रवेश करते, मात्र ती  बल्लारपुरवरून थेट गोंदियाला जाते. नागपपूर तर राहू द्या ती चंद्रपूर किंवा चंद्रपूरमधील दुसरे स्शटेन चांदा फोर्टलासुद्धा जात/थांबत नाही.  म्हणजेच विदर्भातील लोकांना ही गाडी बल्लारपूर किंवा गोंदियाला जाऊन पकडावी लागते. विदर्भातील खासदार याची दखल घेतील काय?*

*संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर वेगळीच रडकथा आहे. मुबई LTT वरून थेट नेपाळ बॉर्डर अर्थात रक्सोल रेल्वेस्टेशनला जाणाऱ्या दोन गाड्या आहेत. अंत्योदय एक्स्प्रेस व कर्मभूमी एक्स्प्रेस. मात्र ह्या दोन्ही गाड्या अनारक्षित (Unreserved) आहेत, म्हणजे या गाड्यांना फक्त द्वितीय(बैठक) श्रेणीचे अर्थात Second seating)चेच अनारक्षित(Unreserved ) डबे आहेत. स्लीपर किंवा एसीचे डबे नाहीत. म्हणजे पुण्या-मुंबईकडील पर्यटकांना या गाडीने प्रवास करण्याचा विचारच करत येत नाही. तात्पर्य ह्या गाड्या बिहार/युपीमधील लोंढे मुंबई/महाराराष्ट्रात  आणणे व त्यांना अधूनमधून त्यांची देश(गावी) जाण्याची सोया करून देणे एव्हढ्यापुरता च आहे असे समजावे. (मा.राज ठाकरे लक्ष देतील काय?)*

*नेपाळमध्ये जाण्याकरिता भारतीयांना पासपोर्ट किंवा व्हिसा लागत नाही. निवडणूक कार्ड मात्र अनिवार्य आहे. आधार कार्ड चालत नाही.*

(बितंबातमी ग्रुपवरून साभार)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: