गतिमान संतुलन
गतिमान संतुलन, पर्यावरणाशी कृतीशील नात सांगणार मासिक. संपादक दिलीप कुलकर्णी. पेशाने इंजिनियर. टेल्कोत ८ वर्ष नोकरी. नंतर गेली २५ वर्षांपासून खेड्यात राहतात. साधे, पर्यावरणाशी सुसंगत जीवन जगतात. तथाकथित विकासाचे द्यावे लागणारे मोल किती भयानक आहे हे लोकांना सांगत असतात. त्यासाठी त्यांनी निवडलेले माध्यम म्हणजे मासिक,तेही तेही फक्त चार पानाचे. कागदही साधा ( कारण कागदाचा वापर म्हणजे जंगल तोड ) जाहिराती नाहीत. प्रायोजक नाही. वार्षिक वर्गणी फक्त रुपये ३० (तीस ).त्यांचेकडे कुठलाही फोन नाही. त्यांच्याशी संपर्क करायचे एकमेव साधन म्हणजे पोस्ट कार्ड. त्यांची १५ हून जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत ती सर्व उज्ज्वल ग्रंथ भांडार, आप्पा बळवंत चौक, पुणे येथे उपलब्ध आहेत. 'गतिमान संतुलन' ची वर्गणी पाठवण्याचा पत्ता--
संपादक, गतिमान संतुलन, मु. पो. कुडावळे, ता. दापोली, जि. रत्नागिरी. पिन कोड ४१५७१२
मासिक दर महिन्याच्या २१ तारखेस प्रसिध्द होते.
राजेंद्र कडू
मासिक दर महिन्याच्या २१ तारखेस प्रसिध्द होते.
राजेंद्र कडू
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा