दलितांनी हे अवश्य वाचावे. इतरांनीही हे वाचायला पाहिजे असे आठवले प्रत्येक पक्षात आहेत. आमचे नेते व राजकारणी कसा विचार करतात हे यावरून लक्षात येईल हे सर्व पाहून शेवटी एकच निष्कर्ष निघतो तो म्हणजे मतदान यंत्रावरील NOTA हेच बटन दाबणे योग्य ठरेल. सर्वच राजकीय पक्षांनी आपली नालायकी सिध्द केलेली आहे. कॉंग्रेसजवळ अशोक चव्हाण आहेत तर भाजपकडे येडीयुरप्पा.
केव्हा, कुठे जायचे हे दलित नेत्यांनी माझ्याकडून शिकावे
| ||
भ्रष्टाचाराचे नवे विक्रम : आठवले
| ||
प्रतिनिधी । नागपूर केव्हा, कुठे जायचे आणि कोणाशी युती करायची हे दलित नेत्यांनी माझ्याकडून शिकावे, असा सल्ला रिपाइंचे अध्यक्ष (आठवले) रामदास आठवले यांनी येथे दिला. विदर्भातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आले असता आयोजित पत्रकार परिषदेत आज ते बोलत होते. सन 1990 मध्ये दलित नेत्यांनी काँग्रेससोबत जावे, अशी आग्रही भूमिका मी घेतली होती. त्या वेळी प्रकाश आंबेडकर, प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्यासह सर्वांनी विरोध केला. शेवटी मी एकटा काँग्रेससोबत गेलो व मंत्री झालो. त्या वेळी दलित नेत्यांनी माझे ऐकले असते, तर दलित समाजाचे किमान 14-15 मंत्री झाले असते. शिवाय 35-40 जागाही मिळाल्या असत्या. प्रा. कवाडे व सुलेखा कुंभारे काँग्रेससोबत गेले. दोघांनीही महाचूक केली आहे. त्यांना काही मिळेल असे वाटत नाही. राजकारण ही फायद्याची गोष्ट आहे, हे समजले पाहिजे. एकेकाळी काँग्रेस-राष्ट्रवादीला धडा शिकवण्यासाठी आपण युतीसोबत गेलो पाहिजे, अशी भूमिका कवाडे सातत्याने मांडत होते. त्या वेळी मी विरोध केला. पण, दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी शिवशक्ती-भीमशक्तीची हाक दिली, तेव्हापासून मत बदलले.(दिव्य मराठी दिनांक ०७/०४/२०१४ ) |
सोमवार, ७ एप्रिल, २०१४
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा