"शाई"स्तेखान निर्माण होणारच
शिवशाहीर पुरंदरे यांच्यावर कुणीतरी शाई फेकली व असा हा शाई फेकणारा संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता होता असे बातमीत म्हटले आहे. झाला हा प्रकार निषेधार्ह आहे. व आपला विरोध प्रकट करण्याचा हा उपाय निश्चितच नाही. एका वृत्तपत्राने ( हे नव्हे ) असे आणखी किती " शाई "स्तेखान निर्माण होणार? असा सवाल विचारला आहे. मात्र असे "शाई"स्तेखान का निर्माण का होतात याचाही विचार केला पाहिजे असे मला वाटते. पुरंदरे लिखित "जाणता राजा"चेच उदाहरण घेऊ या. या "महा"नाट्यात शिवाजी महाराजांचा नि:पक्षपतीपणा दाखवण्यासाठी रांझ्याच्या पाटलाने केलेला बलात्कार व महाराजांनी त्याला केलेली शिक्षा हा प्रसंग घोळवून घोळवून सादर करण्यात आला आहे, या प्रसंगात पाटील अशी आरोळी एकूण बारा वेळा दिलेली आहे. त्याचा प्रस्तुतपणा लक्ष्यात न येण्यासारखा नाही. या उलट गागा भट्ट सहज फिरत फिरत महाराष्ट्रात आले व म्हणून संधीचा फायदा घेऊन महाराजांनी आपला राज्याभिषेक उरकून घेतला असा बनावट प्रसंग दाखवला आहे. येथे मात्र पुण्याच्या ब्रम्हवृन्दाने महाराज हे क्षत्रिय वंशाचे नाहीत व त्यांना राज्याभिषेकाचा अधिकार नाही असा पवित्रा घेतल्यामुळे महाराजांनी भरघोस बिदागी देऊन गागा भट्टाना काशीवरून पाचारण केले होते हा इतिहास खुबीने दडविण्यात आला आहे. शिवाय अमरावती येथे या "महा"नाट्याचे काही प्रयोग झाले. त्यावर बर्ऱ्यांच प्रतिक्रिया नंतर वृत्तपत्रातून आल्या होत्या त्यापैकी परतवाड्याचे सामाजिक कार्यकर्ते व कवी राजा धर्माधिकारी यांनी दिलेली प्रतिक्रिया वाचनीय होती. त्यांनी म्हटले होते की "जाणता राजाचा प्रयोग पाहून घरी परत आल्यानंतर माझ्या मुलाने त्यातील औरंगझेब या पात्राची नक्कल करून दाखविली होती कारण नाटकातील फक्त हेच पात्र खूप चांगले वठविले गेले होते व नाटक पाहिल्यानंतर मुलाच्या लक्षात फक्त औरंगझेबच राहिला होता शिवाजी नव्हे." माझेही असे निरीक्षण होते की औरंगझेबच्या पात्राचे ध्वनिमुद्रण फारच चांगले म्हणजे स्टिरीओफोनिक पद्धातीने केले गेले होते व इतर पात्रांचे ध्वनिमुद्रण साधे होते.
राज्याभिषेकाच्या प्रसंगाच्या बाबतीत शाहिराने अशी चलाखी केल्यामुळे केंव्हा न केंव्हा ती अंगलट येणारच होती. एखाद्याच्या मोठेपणाचा मुलाहिजा किती दिवस ठेवल्या जाऊ शकतो. आपली अब्रू आपणच सांभाळायची असते.
राज्याभिषेकाच्या प्रसंगाच्या बाबतीत शाहिराने अशी चलाखी केल्यामुळे केंव्हा न केंव्हा ती अंगलट येणारच होती. एखाद्याच्या मोठेपणाचा मुलाहिजा किती दिवस ठेवल्या जाऊ शकतो. आपली अब्रू आपणच सांभाळायची असते.
राजेंद्र कडू
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा