स्व.सुनंदा थरूर यांचा खिलाडूपणा की मातृ हृदय प्रवूत्ती. जरी निवडणूक प्रचारात आपली पातळी सोडून मोदी यांनी सुनंदा थरूर याचा उल्लेख "पचास कोटी की गर्ल फ्रेंड " अदा केला होता. तरी सुनंदा यांनी मोदींच्या काश्मीर विषयक धोरणाला पाठींबा जाहीर केला होता. तेंव्हा त्यांचे पती शशी थरूर हे युपीए सरकारमध्ये मंत्री होते तरीही त्यांनी पती व सरकार यांच्या विरोधात जाउन मोदींची भलामण केली होती. कारण त्या स्वत: काश्मिरी होत्या व काश्मिरी विस्थापितांच्या व्यथा जाणून होत्या. या प्रकरणात स्व. सुनंदा यांनी खिलाडूपणा दाखविला म्हणा किंवा स्त्रीला उपजतच असलेली मुलांना त्यांच्या आगळीकीबद्दल माफ करण्याची मातृहृदय प्रवूत्ती दिसते हे सांगणे कठीण आहे. मोदी आता मरणोत्तर तरी दिलगिरी व्यक्त करतील काय ?
सोमवार, १ जून, २०१५
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा