अडवानी जींच्या दुसऱ्या आणीबाणीच्या भविष्यवाणीच्या निमित्ताने. इन्दिरा जी हुकुमशहा होत्या काय ? अलाहाबाद हायकोर्टाने त्यांना लोकसभा सदस्यत्वासाठी अपात्र ठरविल्यानंतर त्यांनी राजीनामा द्यावा असा विरोधी पक्षाने धोशा लावला. त्यांना सुप्रीम कोर्टात अपील करण्याचा अधिकार विरोधी पक्षाला मान्य नव्हता. भरीस भर लोकनायकांनी पोलिस व लष्कराचे जवानांना असे आवाहन केले की " तुमच्या वरिष्ठांचे आदेश तुम्हाला अयोग्य वाटत असल्यास ते पाळू नका." हे फारच भयानक होते. त्यामुळे अराजक माजले असते. परकीय सत्ता असतांना गांधीजींनीसुद्धा कधी असे आवाहन केले नव्हते. जर इंदिराजी हुकुमशहा असत्या तर त्यांनी १९७७ साली आणीबाणी कशाला उठविली असती व निवडणुका घेतल्या असत्या. १९७७ मध्ये सत्तेवर आलेले सरकार जनसंघाच्या (आताच भाजप) कुचाळकीमुळे २८ महिन्यातच गारद झाले. १९८० साली इंदिराजी पुन्हा प्रचंड बहुमताने निवडून आल्या. त्यांना पुन्हा हुकुमशहा होता आले असते. पण तेंव्हा विरोधी पक्ष स्वत:च्या कर्मानेच गलीतगात्र झाला होता. आता अडवानी म्हणतात ती दुसरी आणीबाणी कोण लावणार आहे कुणी सांगू शकेल काय
सोमवार, २२ जून, २०१५
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा