शुक्रवार, १७ ऑक्टोबर, २०१४

मोदींचा पुन्हा महाराष्ट्राबद्दलचा आकस… महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न सुप्रीम कोर्टात न्याय प्रविष्ट असतांना मोदी सरकारने बेळगाव शहराचे बेळगावी असे नामांतर करण्याचा कर्नाटक सरकारचा प्रस्ताव मंजूर केला आहे. विशेष म्हणजे हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे गेली आठ वर्ष पडून होता. युपीए सरकारने त्याला मंजुरी दिली नव्हती. आणि मोदी सरकारने सुद्धा चलाखी करून महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्यावर मतमोजणीच्या एक दिवस आधी ही मंजुरी दिली. आता महाराष्ट्रात जर कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादीचे सरकार आले तरच या निर्णयाला कोर्टात आवाहन दिल्या जाण्याची शक्यता आहे. अन्यथा हा अन्याय मुकाटपणे सहन करणे किंवा निर्णय बदलावा म्हणून आंदोलन करणे एवढेच महाराष्ट्रातील जनतेच्या हातात आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: