बँक ग्राहकाचेही अच्छे दिन आले | बॅंक शाखांतून ग्राहकांनी कमीत कमी वेळा यावे यासाठी त्या
ग्राहकांना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय स्टेट बॅंकेने एटीएम
शुल्कांमध्ये सुधारणा केली आहे. ग्राहकांनी एटीएमचा वापर वाढवावा यासाठी
खात्यामध्ये ठेवल्या जाणाऱ्या शिलकीवर हे एटीएम शुल्क अवलंबून ठेवण्यात आले
आहे.
नवीन एटीएम शुल्क 1 नोव्हेंबरपासून लागू होणार आहेत.
याअंतर्गत बॅंक शाखांतून प्रत्यक्ष पैसे काढण्यावर बंधने घातली जाणार आहेत.
यानुसार खात्यात 25 हजार रुपये शिल्लक ठेवणाऱ्या खातेदाराला बॅंक शाखेतून
दरमहिना फक्त चार वेळा पैसे काढता येतील. दरमहिना सरासरी 25 हजार रुपये
शिल्लक ठेवणाऱ्या खातेदारांना कितीही वेळा एटीएम वापरता येणार आहे. परंतु
स्टेट बॅंकेच्या व्यतिरिक्त अन्य एटीएमचा वापर महिन्याला केवळ तीन वेळाच
करण्याची अनुमती देण्यात येणार आहे. महिनाभरात एकदाही बॅंक शाखेत खातेदार
गेला नाही तर त्याला स्टेट बॅंकेच्या नेटवर्कवरून पाचऐवजी नऊ व्यवहार मोफत
करण्याची संधी मिळणार आहे. एक लाख रुपयांहून अधिक रक्कम
शिल्लक ठेवणाऱ्या खातेदाराला देशभर एटीएम कितीही वेळा वापरण्याची मुभा
देण्यात येणार आहे. मात्र 25 हजार रुपयांपेक्षा कमी शिल्लक खात्यात
ठेवणाऱ्या खातेदाराला स्टेट बॅंकेच्या एटीएम नेटवर्कवर पाच व्यवहारांची
मर्यादा; तर अन्य बॅंकांच्या नेटवर्कवर तीन व्यवहारांची मर्यादा घालण्यात
आली आहे.
|
गुरुवार, १६ ऑक्टोबर, २०१४
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा