मंगळवार, ७ ऑक्टोबर, २०१४

भारतातील सर्व राज्ये लवकरच न. १ होणार .. . . . 

तुम्ही म्हणाल हे कसे शक्य आहे. न. १ वर केवळ एखादेच राज्य असू शकते. सर्व राज्य न. १ कशी होतील. हे मोदींना सहज शक्य आहे. तुम्ही एका आयुर्वेदिक औषध बनविणाऱ्या कंपनीची जाहिरात पाहिली आहे काय ? ती कंपनी म्हणते की जो विद्यार्थी शंखपुष्पी हे आयुर्वेदिक औषध घेतो तो वर्गात नेहमी पहिला येतो. म्हणजेच एखाद्या वर्गातील सर्वच मुले जर शंखपुष्पी घेत असतील तर त्या वर्गातील सर्वच मुलांचा वर्गात पहिलाच नंबर नंबर येईल. होय ना ? तसेच आपल्या आयुर्मोदीक औषधामुळे भारतातील सर्व राज्य पहिलेच येतील. जाहिरातींवर विश्वास ठेवायला शिका जरा कंपनी जाहिरातींवर करोडो रुपये खर्च करत असते. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: