मंगळवार, ५ एप्रिल, २०१६

पान खायो सैय्या हमारो, मलमलकी कुर्ती और  छींट लाल लाल ….….

पान थुंकण्याच्या भारतीयांच्या सवयीने ब्रिटनवासीय वैतागले. गुजराती वंशाच्या लोकांना पान खाण्याची सवय आहे
लिसेस्टर शहरात सार्वजनिक ठिकाणी पानाच्या पिचकारीला ब्रिटनवासीय वैतागले आहेत. यामुळेे रस्ते, कोपरे खराब होत असून स्थानिक पालिका प्रशासनाने त्याविरोधात कठोर कारवाई करण्याची तयारी चालवली आहे. लिसेस्टर सिटी कौन्सिलचे अधिकारी यावर उपाय म्हणून पब्लिक स्पेस प्रोटेक्शन ऑर्डर (पीएसपीओ) लागू करण्याचा विचार करत आहे. पान थुंकण्याच्या बहुतांश तक्रारी मेल्टन बेल्ग्रेव्ह रोड भागातून आहेत.येथे गुजराती वंशाच्या लोकांची सराफा व्यापाऱ्यांची दुकाने जास्त आहेत. त्यांना पान खाण्याची सवय आहे. सिटी कौन्सिलच्या प्रवक्त्याने सांगितले की, "आम्हाला स्थानिक लोकांनी या प्रकाराला वेसण घालण्याची मागणी केली आहे.(दिव्यमराठी)
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: