अरुण शौरी जेंव्हा 'फक्त' पत्रकार होते. तेंव्हा इन्दीराजी आणि राजीव जी यांच्यावर कडाडून टीका करत असत. अंबानीवर राजीव जी कसे मेहरबान आहेत व त्यांचा कसा फायदा करून देत आहेत याची रसभरित वर्णने ते करीत असत. याची बक्षिशी शौरींना मिळाली. वाजपेयींच्या काळात त्यांना मंत्रिपद मिळाले. भांडवलदाराचे सगळेच मित्र असतात. अंबानींनी शौरींना (मंत्री असतांना) आपल्या नवी मुंबईतील महाशैक्षणिक संस्थेच्या उदघाटनासाठी बोलावले होते. तेथे भाषण देतांना यापूर्वी आपले अम्बानीन्बद्दल बरेच गैरसमज होते ते आता दूर झाले आहेत असे निवेदन केले होते. मोदींनी जर त्यांना आताही मंत्रीमंडळात घेतले तर मोदींबद्दलचेही लगेचच दूर होतील यात शंका नाही.
रविवार, ३ मे, २०१५
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा