अमेरिकेला पूर्वेतिहास नाही. अमेरिकेचा इतिहास ३००/३५० वर्षे इतकाच जुना आहे. पाकीस्तानला पूर्वेतिहास नाही. पाकिस्तानचा इतिहास १४ ऑगस्ट १९४७ पासून सुरु होतो. लवकरच भारतही या यादीत येईल असे वाटते. कारण २६ मे २०१४ पूर्वी भारतात काहीच नव्हते. भारताचा इतिहासही बहुधा २६ मे २०१४ पासूनपुढे असाच लिहिला जाण्याची शक्यता आहे. पाकिस्तानात शाळांमधून स्वातंत्र्यपूर्व इतिहास हा 'गाळून' शिकवला जातो. भारतातही २६ मे २०१४ पूर्वीचा 'गाळून' शिकविल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मधली ६६ वर्षे 'अंधायुग' म्हणून दाखविली जातील. त्याचा आंधळेपणाने स्वीकार करावा. शुभम
शुक्रवार, २९ मे, २०१५
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा