मोदींच्या मुंबई दौऱ्यावर साडेतीन कोटी खर्च ………. |
| माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगलींची माहिती, माहिती देण्यास पाच महिने टाळाटाळ गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मुंबई भेटीवर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काही तासांच्या सभेसाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) या राज्य शासनाच्या महामंडळाने तब्बल ३ कोटी ३७ लाख रुपये उधळले असल्याची बाब माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी उघडकीस आणली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मागल्या वर्षी ११ ऑक्टोबर रोजी मुंबईच्या दौऱ्यावर आले होते. दादर येथील इंदू मिल येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रस्तावित स्मारकाचा आणि मुंबई मेट्रो प्रकल्पाच्या पुढल्या टप्प्याचा पायाभरणी समारंभ पंतप्रधानांच्या हस्ते आयोजित केला होता. त्याच दिवशी मोदी यांची पश्चिम उपनगरातील एमएमआरडीए मैदानावर जंगी सभासुद्धा ठेवण्यात आली होती. त्या सभेच्या मंडपासाठी ९३ लाख रुपये आणि उर्वरित रक्कम इतर साहित्यावर खर्च झाली. पाच महिने टाळाटाळ माहिती अधिकार कायद्याच्या तरतुदीनुसार ३० दिवसात माहिती देण्याचे प्रयोजन आहे. मात्र, अनिल गलगली यांना पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्यातील खर्चाची माहिती देण्यास एमएमआरडीए प्रशासनाने तब्बल महिन्यांचा कालावधी लावला.(दिव्यमराठी) |
शुक्रवार, २५ मार्च, २०१६
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा