आण्विक सरोवर कुठे आहे ? ………
कझाकिस्तान हा देश पूर्वी रशियाच्या अधिपत्याखाली होता. या प्रदेशात रशियाने सर्वाधिक म्हणजे ५०० च्या आसपास अणुबॉम्ब चाचण्या घेतल्या आहेत. सन १९४९ ते १९८९ या काळात या चाचण्या घेतल्या गेल्या. अशा ठिकाणांना 'द पॉलिगॉन' असेही म्हटले जाते. १५ जानेवारी १९६५ मध्ये जगातील सर्वात मोठी प्रथम चाचणी या ठिकाणी घेण्यात आली. या प्रकल्पाचे नाव होते "छॅगॅन न्यूक्लअर टेस्ट.' प्रचंड भूमिगत अणुस्फोटाने १३३८ फूट व्यासाचा ३२८ फूट खोलीचा खड्डा तयार झाला. या खड्ड्यात पाणी साचून जे तळे तयार झाले त्याला "अॅटोमिक लेक' किंवा "छॅगॅन लेक' किंवा "लेक बालाप्न' असे म्हटले जाते.या स्फोटामुळे भोवतालचा परिसर किरणोत्सर्गाने व्यापला गेला. त्यामुळे अणुस्फोटानंतरचे भयंकर परिणाम येथील नागरिकांना आजही भोगावे लागत आहेत. आजही जन्माला येणाऱ्या तीन मुलांपैकी एक मूल जन्मत:च काही तरी व्यंग घेऊनच जन्माला येते. पुढेही अनेक वर्षे हे परिणाम येथील लोकांना भोगावे लागणार आहेत. शांततेसाठी जगाच्या भल्यासाठी अणुस्फोट चाचण्या घतल्या जातात, असे सर्वच देश सांगत असतात. मात्र याचे भयंकर परिणाम बघून तसे वाटत नाही. आज हे कृत्रिम सरोवर बघायला जरी पर्यटक येत असले तरी त्या पाण्याच्या जवळ जाण्यास सर्वच घाबरतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा