बुधवार, ४ मार्च, २०१५

जनसंघ नावाचा एक पक्ष १९७७ साली विसर्जित झाला होत. जनता पक्षात सामील होण्यासाठी, जनतेची सेवा करण्यासाठी. मात्र तीन वर्षाच्या आताच त्याने पुन्हा नवा अवतार घेतला,  भारतीय जनता पक्ष या नावाने. कॉंग्रेस नेत्यांनी स्वातंत्र्य मिळाल्यावर १९४७ साली कॉंग्रेस विसर्जित करून पुन्हा तीच मंडळी १९५० साली जेंव्हा घटना लागू झाली (२६ जानेवारी) म्हणजे तीन वर्षाच्या आत किंवा तत्पूर्वी  एकत्र येउन पुन्हा नाव बदलून १९५२ सालच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांना सामोरी गेली  असती  तर लोकांनी भरघोस मतांनी त्यांना निवडून दिले नसते काय ?  कारण लोकांना माहित असते बाटली जरी नवी असली तरी आतले लोणचे मुरलेले आहे. त्यामुळे कॉंग्रेस विसर्जित केली किंवा नाही याने काय फरक पडतो. अहो, वीणा पाटलांनी केसरी टुर्स सोडून वीणा वर्ल्ड नावाची कंपनी काढली तरी त्यांच्या क्षमतेवर जुने ग्राहक विश्वास दाखवणारच. कारण केसरी टूर्समध्ये असतांना ती कंपनी चालवण्यामागे डोके कुणाचे आहे हे ग्राहक जाणून होतेच. शामाप्रसाद मुखर्जींनी पक्ष फार वर्षांपूर्वी काढला पण जनसंघाचे स्वातंत्र्य आंदोलनात सहभाग शुन्य. मग नाव बदलले असते तरी लोक नेहरू, पटेल, पंत, मौलाना आझाद यांच्याच मागे राहिले असते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: