रविवार, ८ मार्च, २०१५

महिलांनो, ……… 

काल महिला दिन झाला. पण तुमची वाट  खडतरच राहील असे दिसते आहे. १) प्रतिभाताईंच्या रूपाने एक महिला राष्ट्रपती होणार म्हणून काही मनुवाद्यांनी त्या निवडणुकीला ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे स्वरूप आणून ठेवले होते व या निवडणुकीत त्या हमखास निवडून येण्याची शक्यता असुनही त्यांना या विजयाचा निर्भेळ आनंद मिळणार नाही याची काही नतद्रष्टांनी पुरेपूर काळजी घेतली. २) विजया वाड यांची विश्वज्ञानकोष मंडळाच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली तेंव्हा त्या मुळी साहित्यिकच नाहीत असा कांगावा करण्यात आला होता. मात्र त्यांच्या कामाचा झपाटा एव्हढा की त्यांनी कोषाचे खंडा मागोमाग खंड प्रसिद्ध करण्याचा सपाटा लावला, व्हीसीडी प्रसिद्ध केल्यात, खंड ऑन लाईन उपलब्ध करून दिलेत,  की जे काम शास्त्री-पंडितांना वर्षोन्वर्षे अध्यक्ष पदावर राहूनही जमले नव्हते. ३) स्टेट बँकेचे अध्यक्ष निवृत्त होण्यापूर्वीच काही महिने आधी त्यांचा उत्तराधिकारी जाहीर केल्या जातो जेणेकरून सांधेबदल सुरळीत व्हावा.  मात्र या वेळेस सेवाज्येष्ठतेप्रमाणे अरुंधती भट्टाचार्य अध्यक्ष होण्याची शक्यता होती. त्यांच्या नेमणुकीसाठी मात्र बरीच खळखळ करण्यात आली  व आधीचे अध्यक्ष निवृत्त झाल्यावरही काही महिने प्रभारी अध्यक्ष नेमून नंतरच अरुंधती भट्टाचार्य यांना नेमणूक देण्यात आली. त्यांनी मात्र अल्प कालावधीतच आपल्या कार्यक्षमतेची चुणूक दाखवून दिली. महिला दिनाच्या शुभेच्छा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: