अमरावतीत पर्यावरण संवर्धनाचा अादर्श उपक्रम
| ||
दाेन हजार लाेकांमध्ये वृक्षलागवडीवर जागृती, मुलाच्या विवाह सोहळ्यात बियाण्यांच्या अक्षता व रोपटे भेट
| ||
अनुप गाडगे अमरावती
| ||
विष्णू भागवत हे निवृत्त भूमी अभिलेख अधीक्षक. त्यांच्या पशुवैद्यकीय डॉक्टर पवन या मुलाचेे चांदूर बाजार तालुक्यातील विनोदराव शेकार यांची कन्या उर्वरितपान. १२ वसंुधरासोबतजानेवारी राेजी लग्न होणार आहे. या लग्नसोहळ्याच्या पत्रिकेचे वैशिष्ट्य म्हणजे, प्रत्येक पत्रिकेवर २५ टक्के मजकूर हा समृद्ध पर्यावरणाच्या संरक्षणासंदर्भात दिलेला आहे. तसेच पत्रिकेसोबत तांदळाच्या अक्षतांएेवजी भागवत यांनी सीताफळ, आवळा अन्य वृक्षांच्या प्रत्येकी १० बिया दिलेल्या आहेत. अशा हजार पत्रिका भागवत यांनी वाटल्या आहेत. वृक्षाराेपण माेठ्या प्रमाणावर वाढावे, या हेतूने हा उपक्रम त्यांनी राबवला अाहे. शासनाकडूनसन्मानित : डॉ.पवन हे सध्या नागपूर जिल्ह्यातील धामणा गावातील पशुवैद्यकीय रुग्णालयात पशुधन पर्यवेक्षक म्हणून कार्यरत आहे. त्यांनी या पशुवैद्यकीय रुग्णालयात नागरिकांच्या मदतीने गोसंवर्धन पुस्तकालय, पक्ष्यांसाठी अन्न पाण्याची सोय, सौरऊर्जेवर रुग्णालयाचे कामकाज, गांडूळखत प्रकल्प, शेतकऱ्यांना दुग्धव्यवसायाची माहिती देण्यासाठी आवश्यक बाबी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांचा २०१३ मध्ये राज्यशासनाने गुणवंत पशुवैद्यक म्हणून डाॅ. पवन यांचा सन्मान केला आहे. पाहुण्यांनाकुंडी भेट डॉ.पवन यांच्या विवाहाचा स्वागत समारोह जानेवारीला अाहे. या साेहळ्याला येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांना भागवत कुटुंबीयांकडून रोपट्यासह कुंडी भेट देण्यात येणार आहे. जवळपास ७०० कुंड्या राेपट्यांसह तयार करण्याचे काम भागवत यांच्या घरी सुरू झाले आहे. पत्रिकेसोबत बियाणे स्वागत समारोहाला कुंडीसह रोपटे देऊन वृक्ष राेपणाबाबत जनजागृती करण्याचा त्यांचा प्रयत्न अाहे. लग्पत्रिकेसोबत अशा पद्धतीने बियाणे दिले आहे. लग्नाचे 'व्हिडिओ' निमंत्रण : डॉ.पवन यांनी लग्नाचे निमंत्रण पत्रिकेद्वारे दिले आहेच शिवाय दोन मिनिटे १० सेकंदाचा एक व्हिडिओ तयार केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी लग्नाचे निमंत्रण तर दिलेच शिवाय वृक्षाची लागवड करून निसर्गाचा समतोल राखावा, असा संदेश त्यांनी या 'व्हिडिओ क्लिप'मधून दिला आहे. हा व्हिडिओ यू ट्यूबवर आहे. दिव्य मराठी विशेष |
शुक्रवार, १ जानेवारी, २०१६
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा