मंगळवार, ६ जानेवारी, २०१५

अशीही एक घरवापसी
गया जिल्ह्यात सहा गावांतील पाचशे हिंदूंनी घेतली बौद्ध धर्माची दीक्षा
गया (बिहार)| गयाजिल्ह्यात मानपुरा विभागातील जवळपास अर्धा डझन गावांतील पाचशे महिला पुरुषांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारला आहे. खंजाहापूर गावातील नवनिर्मित बौद्ध मंदिरात हा धर्मांतर कार्यक्रम पार पडला. बसंत महतो यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा पार पडला. त्यांनी सांगितले की, आम्ही स्वखुशीने हे परिवर्तन करत आहोत. या समारंभात खंजाहापूर, उसरी, बारा, जोडा मशीद, कुकरा आदी गावांतील पाचशे लोकांनी धर्मबदल केला. पैकी काही महिलांनी आम्ही कुटुंबाच्या सुखशांतीसाठी हा निर्णय घेतला. याआधी धर्म बदललेल्या लोकांच्या राहणीमानात आलेला बदल पाहून आम्ही त्याकडे आकर्षित झाल्याचे सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: