गंगामाते, सुबुद्धी दे !
आपल्या सरकारचा सर्वाधिक भर उत्तम प्रशासन व विकेंद्रीकरणावर असेल, असे
प्रत्येक मुलाखतीत जोर लावून सांगणार्या नरेंद्र मोदी यांना, स्वायत्त अशा
निवडणूक आयोगावर पक्षपातीपणाचा आरोप करताना आपल्याच सुविचारांचा विसर
पडलेला दिसतो. राजकारणात असा विसर पडणे, हा एक रोग आहे हे जनता जाणते, पण
तो विसर मोदींना इतक्या लवकर पडला, हे आश्चर्य होय. देशातील सर्वात मोठी
आणि सर्वात अधिक काळ चालू असलेली ही निवडणूक लक्षात राहील, ती मोदी यांच्या
झंझावातामुळे; पण अखेरच्या टप्प्यात त्यांची जी घसरण होते आहे, तिच्यामुळे
त्याला निश्चितच गालबोट लागणार आहे
( दिव्या मराठीच्या आजच्या अंकातील अग्रलेखाची प्रस्तावना. सविस्तर लेख वाचण्याकरिता भेट द्या
www.epaperdivyamarathi.bhaskar.com )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा