| ….… | सागरी पाण्याचा स्तर वाढला तर जगातील प्रमुख शहरात अशी दृश्ये दिसतील ….… 5 जून रोजी 'जागतिक पर्यावरण दिन' साजरा करण्यात येईल. पर्यावरण संवर्धन व संरक्षणासाठी केवळ कागदोपत्री काम दाखवताही येईल. मात्र, कोणत्याही देशाने या समस्येवर ठोस पावले उचलली नाहीत, हेच वास्तव आहे. त्यामुळे हे संकट उग्र रूप धारण करत आहे. जल व वायू प्रदूषणाने प्रत्येक देश ग्रासला आहे. छोट्या द्वीपांवर वसलेल्या देशांना याची पूर्ण जाणीव आहे. सागरी पाण्याचा स्तर वाढल्यावर काय स्थिती असेल ? शहरे त्यात बुडू लागतील. कॉर्बन स्टोरी संस्था, बीडीडीओ विपणन संस्था आणि प्रॉक्झिमिटी सिंगापूर यांच्या संयुक्त विद्यमाने एक संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. गुगल मॅपच्या सहयोगाने 'वर्ल्ड अंडर वॉटर डॉट कॉम ओआरजी' हे संकेत स्थळ विशेषत: क्रोम ब्राउजरवर पाहता येते. सामुद्रिक जलस्तर वाढल्यास जगातील शहरांचे दृश्य काय असू शकते, हे यात दाखवले आहे. पर्यावरणासाठी काम करणार्या या संस्थांचा हा उपक्रम प्रशंसनीय आहे. मात्र असेच होईल का, याविषयी संभ्रम आहे. या संकेतस्थळावर कोणत्याही शहराचे क्षेत्र फीड क रून त्याची भविष्यातील स्थिती बघता येते. या दृश्यांना फेसबुक व ट्विटरवर शेअर करता येते. हे चकित करणारे आहे. | |||||
गुरुवार, ८ मे, २०१४
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा